कर्म. सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी कृषी महामहोत्सव २०२४ या कृषी प्रदर्शनाची तयारी सुरू
(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन)
दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर यांचे वतीने भरविण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनाची सध्या तयारी सुरू आहे. सदर प्रदर्शन दिनांक 15 जुलै ते 19 जुलै 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे आवारात होणार असून सदर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे शुभहस्ते व पालकमंत्री मा.ना चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली व राज्याचे कृषिमंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब, पणन मंत्री मा.ना.अब्दुलजी सत्तार साहेब, यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे . असे जिल्ह्याचे नेते मा.आमदार.श्री. प्रशांतरावजी परिचारक साहेब यांनी सांगितले.
तसेच सदर प्रदर्शनामध्ये कृषी विभाग व शासकीय स्टॉल तसेच बी बियाणे, खते, औषधे, यंत्रसामग्री, ड्रिप इरिगेशन, पंप सोलार, सिस्टीम तसेच विविध इतर माहितीचे स्टॉल असून हे सर्व स्टॉल वारकरी व शेतकरी बंधूंसाठी माहिती घेणे करिता संपूर्णतः मोफत असून याचा सर्व वारकरी व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा.श्री.हरिषदादा भास्करराव गायकवाड व उपसभापती मा.श्री.राजुबापू विठ्ठलराव गावडे यांनी केलेले आहे. यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते.