आमदार अभिजित पाटील यांच्या सन्मानार्थ अजनसोंड येथील युवकांचा अनोखा उपक्रम!
(अजनसोंड येथील शाळेला केपाची माती भेट देऊन,डुबल बंधूंनी दिल्या आमदार अभिजीत पाटील यांना अनोख्या शुभेच्छा)
माढा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या पंढरपूर सोलापूर रस्त्यावरील अजनसोंड येथील युवक नेते शांतिनाथ मच्छिंद्र डुबल व विजय मच्छिंद्र डुबल या बंधूंनी आमदार झाल्या बाबत अभिजीत आबा पाटील यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये एक आगळावेगळा व नवीन तरुण पिढीला लाजवेल असा उपक्रम राबविला असून त्यांनी अजनसोंड येथील शाळेला स्वखर्चाने केपाची माती भेट दिली असून या अनोख्या राबवलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की; गावातील शाळेतील मैदानामध्ये सर्व लहान मुलांना मैदानी खेळ खेळता यावेत यासाठी आम्ही अग्रक्रमाने प्राधान्य देऊन ही माती त्या शाळेला भेट दिली असून जवळ जवळ दोन ते चार टिपर एवढी माती भेट दिली आहे.. या त्यांच्या उपक्रमा बाबत संपूर्ण माढा मतदारसंघाबरोबरच पंढरपूर तालुक्यातून ही त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी सुनील पाटील, सचिन चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक गणेश खरतडे, पवार सर, देशमुख सर प्रकाश डुबल आदी मान्यवर उपस्थित होते.