आगामी पाच वर्षात तालुक्याचा कायापालट करु : आ. शहाजीबापू पाटील
(तालुक्यातील चिणके, वझरे, अनकढाळ, राजुरी, ह. मंगेवाडी, जुजारपूर ,गुणापावाडी, जुनोनी, पाचेगाव खुर्द ,चोपडी, नाझरा येथे प्रचारसभा संपन्न!)
राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्याच्या विकासासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी दिल्याने गेल्या पाच वर्षात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठे यश आले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्याने तालुक्याचा परिपूर्ण विकास होण्यास मदत झाली. माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी मोठी एमआयडीसी, मेडिकल कॉलेज ,इंजिनिअरिंग कॉलेज, व्यावसायिक कॉलेज तसेच मोठमोठ्या कंपन्या तालुक्यात आणून तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण करायचे आहे .येत्या वर्षभरात तालुका हिरवागार होणार आहे. तालुक्यात परंपरेनुसार घराणेशाही राजकारण होऊ देऊ नये. माझी शेवटची निवडणूक असल्याने सर्वांनी आपले पवित्र मत देऊन पाच वर्षे पुन्हा सेवा करण्याची संधी दिल्यास तालुक्याचा कायापालट करून दाखवू असे विचार आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील प्रचार सभेदरम्यान व्यक्त केले.
गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सांगोला तालुक्यातील चिणके, वझरे, अनकढाळ, राजुरी , ह. मंगेवाडी, जुजारपूर, गुणापवाडी ,जुनोनी, पाचेगाव खुर्द ,चोपडी, नाझरा येथे प्रचारसभा घेण्यात आल्या .
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले ,तालुक्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी एमआयडीसी आणण्याचे नियोजन आहे. उरलेले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक वेळ संधी द्या. तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी माझी राजकीय लढाई होती. शेतीला पाणी देण्यासाठी पाणी संघर्ष चळवळ उभा केली. तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवले नाही. पाणीदार आमदार म्हणून बापूंची तालुक्यामध्ये व राज्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे . टेंभू योजनेत बुदधेहाळ तलावाचा समावेश केला . जल जीवन मिशन योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक घराला पाणी देण्याचा संकल्प आहे . चोपडी गावात २१ कोटी ८८ लाखाची विकास कामे झाले आहेत.मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस मतांनी विजयी करून तालुक्याचे व राज्याचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रचारदौऱ्या दरम्यान केले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, शिवाजी घेरडे, दीपक ऐवळे, राजू पाटील ,सोमनाथ ऐवळे, अजय सरगर ,चंद्रशेखर कवडगी ,तानाजी काटे, एन .वाय.भोसले सर ,सरपंच शोभा भुसनर, उपसरपंच पोपट यादव , ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर, बापूराव यादव, इंजिनीयर एल. बी. केंगार, चेअरमन दगडू बाबर भाजपचे तालुका उपाध्यक्ष अनिल चौगुले, श्रीमंत सरगर, अजिंक्य शिंदे, विनायक बाबर, सचिन खळगे, भाजपचे महेश गुरव, लक्ष्मण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठनेते विजयदादा शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत ,माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, भाजपच्या नेत्या राजश्रीताई नागणे पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, सोमनाथ ऐवळे ,दादासाहेब वाघमोडे सर, ॲड. बंडू काशीद, माजी सभापती संभाजीतात्या आलदर , भीमराव घेरडे सर , नामदेव पाटील, आर. एस. बाबर सर ,आत्माराम काटे ,सचिन वाघमारे, नामदेव पाटील, समाधान भुसनर यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ गावभेट दौऱ्यादरम्यान मनोगत व्यक्त केले .त्यांनी सांगितले की बापूंनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. परंतु या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी बापूंचा केसाने गळा कापला आहे. परंतु जनता या स्वार्थीपणाला माफ करणार नाही. आपले अनमोल मत वाया जाऊ न देता विकास करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मत द्यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यामध्ये महायुती शासनाचा अनमोल वाटा आहे. आमदार शहाजीबापू पाटील हे तालुक्यामध्ये मोठी एमआयडिसी आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतील .बापूंनी ३५ वर्षे पाण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष केला. स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्यात कोणतेच मोठे भरिव काम केले नाही .महायुतीचा धर्म पाळून आमदार शहाजीबापू पाटील यांना एक संघपणे साथ देऊया . विकासाचे पर्व मतदारांच्या हातात आहे. शहाजीबापू पाटील यांना निवडून देऊन तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी देऊया .आमदार झाल्यानंतर बापू महायुती शासनामध्ये निश्चितपणे नामदार होतील व तालुक्याचे भाग्य उजळेल. बापूंनी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस करून , ५ हजार कोटीहून अधिक निधी खेचून आणला .गेल्या ५५ वर्षात स्व.गणपतराव देशमुख यांनी पाण्यासाठी संघर्ष ही फाईल पुढे सरकवण्याचे धाडस केले नाही. परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आमदार शहाजीबापू पाटील यशस्वी झाले. प्रचार सभेसाठी आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रत्येक गावातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सभेसाठी मोठ्या प्रमाणात मतदार युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.