माजी आ.प्रशांतराव परिचारक यांची भगीरथ दादा भालके यांच्याबाबत सहानभूती!
दामाजी कारखान्यावरच्या कार्यक्रमांमध्ये दोन्हीही नेते पहिल्यांदाच दिसले एकत्र!
आगामी काळात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात मोठी राजकीय उलथापालत होण्याची शक्यता!
(मा आमदार प्रशांत परिचारक हेही पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून पंढरपूर मंगळवेढ्यात इच्छुक!)
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली (एन. सी. डी. सी.) यांच्याकडून कारखाना उभारणीपासूनच्या इतिहासात प्रथमच ९४ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. श्री. आमदार प्रशांत परिचारक यांचा कृतज्ञता सत्कार आयोजित केला होता या सोहळास उपस्थित राहून त्यांनी सत्कार स्वीकारला…!
सदर प्रसंगी मा.आमदार प्रशांत परिचारक बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखान्यास ९४ कोटी कर्ज मंजुर झाले असून तेच अभिनंदनास पात्र आहेत.
उद्योजक आपण उत्पादन केलेल्या मालांचा दर तो स्वतः ठरवितो, परंतु साखर कारखानदारांनी उत्पादित केलेली साखर व इतर पदार्थाचा दर ठरविणे कारखानदार व शेतकरी यांचे हातात नाही. ऊसाची किंमत शासन ठरविते, तो ठरविलेला ऊस दर शेतकऱ्यास देणे कारखानदारास बंधनकारक असते.
आम्ही सहकारी संस्थेत राजकारण न आणता मदतीचा हात देऊन संस्था ठिकावी यासाठी पुर्वीपासूनच सहकारी संस्थेस मदत करतो. कारखानदारी उभी करणे सोपी असून ती चालविणे फार जिकीरीचे आहे,
तसेच संचालक मंडळ निवडून आल्यानंतर संस्थापक धनश्री परिवार व माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल सह.सा. कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके, कर्मयोगी पतसंस्थेचे मार्गदर्शन उमेश परिचारक, माजी संचालक व जिजामता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, माजी संचालक दामोदर देशमुख रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी गळीत हंगाम चालु करणेसाठी आर्थिक मदत करुन मोलाचे सहकार्य केले असल्यामुळे ते खरे सत्कारास व अभिनंदनास पात्र आहेत…!
संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांची मागील असणारी देणी देण्याचा प्रयत्न करावा, कारखाना आर्थिक अडचणीत असताना तालुक्यातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी संचालक मंडळावर विश्वास टाकून सभासदत्व स्विकारलेले असून हे महाराष्ट्रातील साखर कारखानदारातील एकमेव उदाहरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्यांचे थकित पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दयावीत, या संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे ऊसास चांगला दर देऊन शेतकऱ्यांचे राहणीमान ऊचविण्याचे काम केलेले आहे त्या बद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करतो…!
या कार्यक्रमास प्रा.शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल सह. सा. कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथदादा भालके, चेअरमन शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन तानाजी भाऊ खरात,माजी संचालक व जिजामता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, माजी व्हा. चेअरमन रामचंद्र वाकडे, माजी संचालक यादापा माळी, श्री पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे,पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतिश मुळे, पंढरपूर मार्केट कमिटीचे चेअरमन हरीशदादा गायकवाड, मार्केट कमिटीचे माजी सभापती दाजी पाटील, पांडूरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांत बुगडे, युवक नेते प्रणव परिचारक, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, सुभाष माने सर, माजी सभापती वामन माने सर, सुभाष मस्के सर, दिलीप चव्हाण, माजी उपसभापती लक्ष्मणतात्या धनवडे,प्रशांत (भैय्या) देशमुख, उपसभापती राजुबापू गावडे, तानाजीबापू वाघमोडे, पांडूरंग घंटी, भास्कर कसगावडे, रतिलाल गावडे, रामचंद्र जगताप, मारुतीबापू वाकडे, अजित जगताप, प्रविण खवतोडे, कल्याण रोकडे, पप्पू स्वामी, श्रीकांत साळे, एकनाथ होळकर, कांतीलाल ताटे, विष्णू मासाळ, विजय बुरकूल, नितीन पाटील, भिमराव मोरे, रणजितसिंह पाटील,सिध्देश्वर डोके, हेमंत निकम, उल्हास पाटील, अमोल वाकडे, रामचंद्र नागणे, दत्तात्रय यादव, मुरलीधर सरकळे, दौलत माने, तम्मा जगदाळे, काशिनाथ पाटील, भारत पाटील, जालिंदर व्हनुटगी, बिराप्पा कोकरे, अशोक माळी, बाबासो पाटील, रामभाऊ माळी, शहाजी उन्हाळे, राजाराम जगताप, दामाजी सह.साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औबर वाडवेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा बोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,सुनील भोसले, रणजित जाधव, विकी अभंगराव, सुरज राठी,कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी,सदर प्रसंगी मोठ्या संखेने सभासद शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते…!