फुलचिंचोली ग्रामपंचायतीस नूतन जि.प. सदस्या दुर्गाताई अंकुशराव यांची भेट
(सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; ग्रामस्थांनी केला सत्कार)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मतदान रुपी तुम्ही मला भरघोस मताने विजयी केले आहे, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद च्या माध्यमातून जी कामे आहेत ती कामे करण्यासाठी कटीबद्ध असून तुम्ही मला जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व नेतेमंडळी,कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा दौरा आयोजित केला असल्याचे गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या नूतन सदस्या दुर्गाताई गोपाळ अंकुशराव यांनी सांगितले.
फुलचिंचोली ता. पंढरपूर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. नूतन जिल्हा परिषदेच्या सदस्या दुर्गाताई अंकुशराव यांनी निवडून आल्यानंतर प्रथमच भेट दिल्याबद्दल त्यांचा फुलचिंचोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते कल्याणराव पाटील व सरपंच नारायण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फुलचिंचोली येथील अतिशय जुन्या काळातील हेमाडपंथी अंबाबाई मंदिराचे काम चालू केले आहे त्याची पाहणी देखील यावेळी दुर्गाताई अंकुशराव यांनी करून त्यांनी अंबाबाई मातेचे दर्शन घेतले. फुलचिंचोली येथील प्रतिष्ठित नागरिक नानासाहेब कोळी यांच्या घरी ही त्यांनी सदिच्छा भेट देत सत्कार स्वीकारला.
यावेळी उपसरपंच दादा प्रक्षाळे, रमाकांत पाटील, शांकर गायकवाड पुळुजचें महेश कांबळे, देव अंकुशराव, बिरू कोकरे,मारुती वाघ, चंद्रकांत काळे, बबन वाघ, हरिदास गायकवाड, नामदेव काळे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, मोहन जाधव, बळी जाधव, मधुकर औंढकर, सुनील शिंदे, हनुमंत गायकवाड ग्रामसेवक मुजावर भाऊसाहेब आदीसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कल्याणराव पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच नारायण जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब काळे यांनी केले.
