विधानसभेसाठी तालुक्यातील नवमतदारांनी नोंदणी करावी – दादासाहेब लवटे
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन
आगामी विधानसभा निवडणुकीत १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. २५ जूनपासून या कार्यक्रमाला सांगोला विधानसभा मतदारसंघांत सुरुवात झाली आहे.न१ जुलै रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदाराचे नाव मतदार यादीत नोंदविण्यात येणार असल्याने सांगोला तालुक्यासह विधानसभा मतदारसंघातील नवमतदारांनी नोंदणी करावी असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात असून १ जुलै रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदाराचे नाव मतदार यादीत नोंदविण्यात येणार आहे. २० ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारा गृहभेटी देत आहेत. याद्वारे घरोघरी सर्वेक्षण, मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना, बीएलओ ॲपद्वारे मतदारांची पडताळणी, मतदार यादीतील अस्पष्ट फोटो बदलवून त्याऐवजी चांगले फोटो यासह अनेक बदल करण्यात येणार आहे. याद्वारे मतदार यादी अचूक होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये १ जुलै २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी नवमतदारांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात कागदपत्रे जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे. नवीन मतदार नावनोंदणी व मतदार यादीतील दुरुस्ती, पडताळणीबाबत काही अडचण असल्यास मतदारांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे स्विय सहाय्यक दत्ता गायकवाड (९८९०९०१३११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.