खोटे बोलून गैरसमज पसरवून लोकांची दिशाभूल करणे एवढेच विरोधकांची काम आहे:-खा.धनंजय महाडिक
(खोटे बोलून सत्ता मिळवणे, सत्ता आल्यावर भ्रष्टाचार करणे एवढेच काँग्रेसचे काम:-खा.धनंजय महाडिक)
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
लबाड बोलुन जनतेची दिशाभुल करण्यात काँग्रेससह विरोधक तरबेज आहेत. खोटं बोलुन मतं मिळवायची आणि सत्ता आल्यावर आश्वासने न पाळता भ्रष्टाचार करणं हे त्यांचं काम आहे. मात्र केंद्र आणि राज्यातील सरकार गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचं निर्णय घेत आहे. केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत जनहिताच्या योजना राबवणार्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. संगांनि योजना समितीच्या लाभार्थ्यांना पत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार महाडिक यांनी कर्नाटकमध्ये सरकार येऊन१ वर्ष झालं तरी जाहीर केलेल्या एकाही योजनेची अंमलबजावणी झाली नाही. मात्र महाराष्ट्रातील सरकार लोककल्याणकारी अनेक योजना राबवत असून पारदर्शकपणे योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्य सरकार केवळ घोषणा करणारं नव्हे तर आपुलकीनं जनतेची काळजी घेणारं सरकार आहे. आपल्या घरात एकवेळ जेवलेला पाहुणाही जेवणानंतर अन्नदाता सुखी भव म्हणतो. तर सरकार ५ वर्षे रेशनवर मोफत धान्य देत आहे मग या सरकारसोबत आपण राहणं आपलं कर्तव्य आहे.त्यामुळं भविष्यात लोककल्याणकारी योजना बंद पडु नयेत म्हणून महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचं आवाहन केलं.
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सरकार संजय गांधी निराधार योजनेसह तीर्थाटन, लाडकी बहीण, मोफत शिक्षण, वयोश्री यासह अनेक लोककल्याणकारी योजना राबवत आहेत. केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ घोषणा करत नाही तर लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा करत आहे. त्यामुळं जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहण्याचं आवाहन केलं. युवा नेते राहुल आवाडे यांनी राज्य सरकार गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकर्यांचं सरकार आहे हे कृतीतून दाखवून दिलं आहे. त्यामुळं भविष्यात विधानसभा निवडणुकीसह सर्वच निवडणुकीत भाजपचे उमेदवार मताधिक्यांनी विजयी करण्याचा संकल्प केल्याचं सांगत शहराचा पाणी प्रश्नही लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला.
मा. खासदार निवेदिता माने यांनी संगांनि योजनाच्या लाभार्थ्यांना ३ हजार अनुदान मिळण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्याकडं शिफारस करण्यासाठी आल्याचे सांगितले. समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी राज्यातील गतीमान महायुती सरकारमुळे गरीबांना न्याय मिळाला आहे. भविष्यात या योजनेच्या लाभार्थ्यांना 3 हजार रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी केली.कार्यक्रमास हिंदुराव शेळके, तानाजी पोवार, अमृत भोसले, प्रसाद खोबरे, प्रकाश दत्तवाडे, चंद्रकांत इंगवले, सतीश पंडित, प्रदीप माळगे, मनोज हिंगमीरे, सरीता आवळे, उर्मिला गायकवाड, पूनम जाधव, अश्विनी कुबडगे यांच्यासह समितीचे सदस्य, लाभार्थी उपस्थित होते.