*राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप!*
*(राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १७ मधील शाळा नंबर ७ येथे शालोपयोगी साहित्यांचे वाटप!)*
*(मनसे नेते दिलीप बापु धोत्रे यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, संस्थापक अध्यक्ष, राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक 17 मधील नगरपरिषेच्या शाळा क्रमांक 7 मधील शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे( वह्या शालेय दप्तर व पुस्तकाचे) वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले!
या वेळी मनसे नेते दिलीप बापु धोत्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की; आम्ही नगरपालिकेच्या कुठल्या प्रस्तावाची किंवा कशाही वाट न पाहता या सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना कम्प्युटर देणार असून त्यांचे शिक्षण अत्याधुनिक पद्धतीने होण्यासाठी लागेल तेवढी मदत मला तुम्ही मागा..
पंढरपूर शहराचा निधी एकीकडे, दुसरीकडे फक्त माझ्या प्रभागातील निधी बघा किती आहे ते जवळजवळ मी 30 कोटी रुपये आत्तापर्यंत या प्रभागासाठी आणले असून आपण या माझ्या प्रभागातील दोन शाळांसाठी वाटेल ती मदत मला मारा मी ती पूर्ण करेन कुठल्याही कशाच्या मान्यतेची वाट न बघता मी मदत करण्यासाठी सदैव आपल्याला कटिबद्ध आहे.. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षण हे मोठी गोष्ट असून आपण लागेल तेवढा निधी मला मागा लागेल तेवढा निधी मी देईन तुम्हाला असेही अभिवचन यावेळी आपल्या मनोगतातून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी यावेळी दिले..
या कार्यक्रमास प्रभागातील दुसरे नगरसेवक लोकेश आप्पा यादव, नगरसेवक प्रसाद कळसे,मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर शहाराध्यक्ष संतोषजी कवडे, समाजसेवक उत्तम बाबा चव्हाण, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, तालुकाध्यक्ष कृष्णा ताड, याचबरोबर.. मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
