पंढरपूर येथे कै. पांडुरंग (तात्या) माने यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त गरजुंना उबदार ब्लॅंकेटचे वाटप
कै. पांडुरंग (तात्या) माने यांच्या 7 व्या पुण्यतिथीनिमित्त फाऊंडेशनच्या वतीने गोरगरीब गरजूंना उबदार ब्लॅंकेटचे वाटप : कै. पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनच्या संचालिका सुरेखाताई माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पांडुरंग तात्या माने फाऊंडेशनच्या संचालिका सुरेखाताई माने, गणेश माने,निलेश माने,उमेश जाधव, तेजस अभंग, सोमनाथ झाडबुके,संकेत श्रीखंडे, व आदी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.
कै. पांडुरंग (तात्या) माने यांनी आपलं संपूर्ण आयुष्य तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित केलं होतं. अनेकांच्या अडीअडचणी धावुन जाणारे तात्या सर्वसामान्यांसाठी आधारवड वाटत. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबियांनीही त्यांनी प्रज्वलित केलेली समाजसेवेची ज्योत अखंडीत तेवत ठेवली आहे. सार्वजनिक वाचनालय, वार्ताफलक, पाणपोई, रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम या फाऊंडेशन च्या मार्फत राबवले गेले. कोरोना काळात कै.तात्यांचा मुलगा निलेश माने याने स्वतः: पंढरपूर शहर परिसरातील विविध भागात पायपीट करून कोरोना योध्दा असणारे पोलीस, नगरपरिषद कर्मचारी , डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी यांना पिण्याचे पाणी व चहा पुरवला होता. कोरोना काळात शहरातील बेवारस व गरजवंताच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी ही या फाऊंडेशन ने विशेष प्रयत्न केले होते.
आज कै. पांडुरंग तात्या माने यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून गरजुंना ब्लॅंकेटचे वाटप केले, पुढील काळातही आवश्यक वाटेल तेंव्हा समाजाची सेवा करणार आहोत. तात्यांचा आशिर्वाद आणि श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेची कृपा असेल तर समाजसेवेचं तात्यांनी लावलेलं हे रोपटं भविष्यात नक्कीच वटवृक्षात रूपांतरीत होईल. असा आशावाद यावेळी बोलताना निलेश माने यांनी व्यक्त केला.