मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा:-आ.समाधान आवताडे
हजार ९९६ अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत 3 हजार 982 अर्ज मंजूर करण्यात आले असल्याचे तहसिलदार मदन जाधव यांनी सांगितले. तसेच महसूल विभागाचा ‘महसूल पंधरवडा’ ०१ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होत असून . महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतची माहिती तहसिलदार जाधव यांनी यावेळी दिली.
तसेच पंढरपूर तालुक्यात ६३ हजार ८६० ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत १० हजार अर्ज मंजूर करण्यात करण्यात आले असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तालुक्यातील जास्तीत-जास्त महिलांना रक्षाबंधन दिवशी लाभ देण्यात येईल. तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी ५९२अंगणवाडी सेविकांडून सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे तहसीलदार सचिन लंगूटे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कांचण सिध्देश्वर मोहिते या महिलेचा अर्ज स्वत: आमदार समाधान आवताडे यांनी भरला.
यावेळी मंगळवेढा तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महसूल पंधरवडा निमित्त रोज आयोजित केलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.