भाजपाचे नुतन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार!
(भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुशील भैया क्षीरसागर व सुदर्शन यादव, यांनी केला कृष्णराज महाडिक यांचा मुंबई येथे सन्मान)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल युथ आयकॉन, राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज (भैय्या) महाडिक मोहोळ भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात भाजपा नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर यांनी भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विविध विषयांवर संवाद ही साधला कृष्णराज भैय्या यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील युवा शक्ती अधिक संघटित, सक्षम आणि प्रभावीपणे कार्यरत होईल. राज्यभरातील तरुणांना एकत्रित करून त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभागी करून घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी ते नक्कीच सार्थपणे पार पडतील, असा ठाम विश्वास यावेळी सुशील भैया शिरसागर यांनी व्यक्त केला..याप्रसंगी सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष मा. सुदर्शनजी यादव उपस्थित होते.
