
भाजपा तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांच्या वतीने श्री राम नवमी व भाजपा स्थापना दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा!
(भाजपा केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार:सुनील चव्हाण)
दिनांक सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या भाजपा स्थापना दिवस व श्रीराम नवमीचा योग एकत्र आला असून हा दिवस भारतीय जनता पार्टीच्या सर्व भारत देशातील व व महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा दिवस असून यामुळे सर्व भाजपाच्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा प्राप्त होणार आहे या दिवसाचे औचित्य साधून मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांनी हा स्थापना दिवस अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला यावेळी भारत माता की जय व देशाचे वंदनीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आगे बढो,च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला सुनील चव्हाण यांनी सर्व महिलान सोबत हा दिवस साजरा केला. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांच्याबरोबर टाकळी सिकंदर भागातील सर्व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस…. शुभ दिनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी मा. जि प सदस्य चंद्रकला सुनील चव्हाण यांनी महिला कार्यकर्ती समवेत स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला ..यावेळी भारत माता की जय ..देशाचे वंदनीय पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढो च्या घोषणा देण्यात आल्या.. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील दादा चव्हाण उपस्थित होते..