
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची लिंगराजजी शेंडगे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
सदस्य नोंदणी अभियानामध्ये अडीचशे पेक्षा जास्त सदस्य संख्या वाढवल्याबाबत भाजपा प्रदेश कार्यालयावरून शेंडगे यांना अभिनंदन पर पत्र!
भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली सदस्य नोंदणी अभियान सुरू केल्यामुळे अनेक नवतरुण युवकांनी व युवतीने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून भाजपा सदस्य नोंदणी अभियानास मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे (पूर्व) उपाध्यक्ष मोहोळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लिंगराजजी शेंडगे यांनी सदस्य नोंदणी अभियान राबवून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केल्यामुळे व जवळजवळ २५० पेक्षा जास्त लोकांनी या सक्रिय सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून अभिनंदनपर पत्र प्राप्त झाले असून त्यांनी केलेल्या या कामाचा उल्लेख मोठ्या प्रमाणात भाजपा प्रदेश कार्यालयाकडून नोंद घेण्यात येऊन त्यांना पत्र प्राप्त झाले आहे.. शांत स्वभावाच्या असलेल्या भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष लिंगराजजी शेंडगे यांनी केलेल्या या सदस्य नोंदणी अभियानाबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून राज्यसभेचे.. खासदार धनंजय महाडिक व भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.