
भाजपा मोहोळ तालुक्याच्या वतीने नूतन पालकमंत्री मा.ना. जयकुमार गोरे यांचा सत्कार संपन्न!
(तालुकाध्यक्ष सुनीलदादा चव्हाण व मित्रपरिवारच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन)
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. जयकुमार गोरे यांची सोलापूर विश्रामगृह येथे मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने व शाल देऊन स्वागत करण्यात आले तालुकाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील (दादा) चव्हाण यांनी पालकमंत्री यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार मा.सचिन (दादा) कल्याण शेट्टी, मा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तसेच मोहोळतालुका भाजपाचे प्रमुख पदाधिकारी विशाल पवार, भाजपा कर्यकर्ते माऊली भगरे, प्रमोद जाधव, तानाजी पाटील, संजय वाघमोडे, दिपक पुजारी, सुशील (भैया) क्षिरसागर, सुशील मोटे आधी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.