“भीमा” ने ऊसबीले दिली! युवानेता विश्वराज महाडिक यांचा सत्कार! भीमालाच ऊस घालण्याचा अंकोली ग्रामस्थांचा निर्धार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

भीमा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर एफ.आर.पी प्रमाणे संपूर्ण ऊस बील अदा केल्याने युवानेता मा.विश्वराज (भैय्या) महाडिक यांचा व भीमा कारखान्याचे जेष्ठ संस्थापक सभासद मा.विलास दाईंगडे मामा यांचा अंकोली ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे.

दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना ऊस बील मिळाल्याने पंचक्रोशीत आनंदाचे व ऊत्साहाचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत व शेतीच्या पुढील कामांसाठी गती आली आहे.ऊसबील दिल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भीमा कार्यक्षेत्रात समाधानाची लहर पसरली आहे.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब पवार यांनी भीमा कारखाना सभासदांच्या मालकीचा कारखाना असून चेअरमन धनंजय महाडिक यांनी केलेल्या आवाहनानुसार आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अंकोलीच्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याच कारखान्याला ऊस घालण्याचा निर्धार केला असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

या प्रसंगी नानासाहेब पवार,आंबादास भोसले, तुकाराम गवळी, मनोहर पवार गुरजी, भास्कर डोके, भाजपाचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष माऊली भगरे, तानाजी पवार, रणजीत पवार,चंदू पुजारी, पिंटू पाटील, ,धनू पाटील, रामभाऊ पवार, कुबेर भोसले, दाजी पवार, गुरूनाथ भोसले, दौलत पाटील आदी मान्यवर व शेतकरी सभासद उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here