रसायन मिश्रित डिझेल ची विक्री वैराग च्या भूमकर सह 9 जण अटकेत- पालघर थेट कनेक्शन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर // प्रतिनिधी 

शहरातील हॉटेल समर्थ जवळ एका टँकर मधून खासगी बस मध्ये बेकायदेशीर डिझेल भरताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 14 ऑक्टोबर रोजी कारवाई केली
रसायन मिसलेळ्या भेसळयुक्त डिझेल ची निर्मिती व विक्री करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून या गुन्ह्यांचे थेट कनेक्शन पालघर पर्यंत गेले असून साई ओम पेट्रो स्पेसीलिटीज लिमिटेड या कंपनीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून डिझेल बनवण्यासाठी केमिकल कोठून आणले याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकारांना दिली
हिमांशू संजय भूमकर (वय 21 रा भूमकर कॉलनी वैराग ) यांना अटक झाली असून दिनांक 20 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे ते टँकर मधून डिझेल पाठवत होते पालघर मधील दोघांना अटक करण्यात आली आहे
तानाजी कालिदास ताटे ( मानेगाव बार्शी ) युवराज प्रकाश प्रबळकर (रा पंचशील नगर वैराग बार्शी ) आकांक्षा लॉजिस्टिक कार्यालयाचे मालक, अविनाश सदाशिव गंजे (रा भवानी पेठ चडचणकर अपार्टमेंट सोलापूर ) सुधाकर गंजे (रा जुना पूना नाका अवंती नगर सोलापूर ) कार्यालय मॅनेजर श्रीनिवास चव्हाण (अभिषेक नगर सोलापूर ) बसचालक हाजू लतीफ शेख (कौडगाव उस्मानाबाद ) यांना 14 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून रविवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे या बाबत माहिती अशी की पुणे महामार्गवर हॉटेल समर्थ समोर च्या बाजूला मैदानात आकांक्षा लॉजिस्टिक या खासगी बस पार्किंग ची जागा आहे त्या जागेत टँकर ( एम एच 25 ए के 2417 ) खासगी बस मध्ये ( एन एल 01 बी 1687 ) डिझेल भरत होते गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई केली होती घटनेदिवशी सहाजणांना ताब्यात घेतले होते एक डिझेल टँकर व आकांक्षा लॉजिस्टिक च्या तीन बसेस जप्त केल्या आहेत
फौंजदार सचिन शिंदे यांनी फौंजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली होती अधिक तपास केला असता केमिकल पासून तयार केलेली डिझेल निर्मिती कोठे होते व विक्री कोणी करते? याचा शोध घेताना हिमांशू संजय भूमकर यांचे नावं समोर आले त्यांच्याकडून पालघर ची माहिती मिळाली
*तपास पथक थेट पालघर ला गेले*
बनावट केमिकल वापरून डिझेल निर्मितीचे काम खुपरी ( ता वाडा जिल्हा पालघर) येथील साई ओम पेट्रो स्पेशालिटिज लिमिटेड या कंपनीत असल्याचे समोर आले गुन्हें तपास पथक पालघर येथे जाऊन चौकशी केली असता तेथे साई ओम पेट्रो कंपनी ची माहिती घेतली असता ऑइल रिसायकल व्यवसायाचा परवाना असताना केमिकल च्या साह्याने डिझेल तयार करून विक्री करत असल्याचे समोर आले कंपनीतील विविध प्रकारचे मशनरी साहित्य रासायनिक द्रव्यपदार्थ भेसळसाठी तयार केलेली मशनरी अशी 17 कोटी ची मालमत्ता जप्त करण्यात आली या कंपनीने डिझेल बनवण्यासाठी केमिकल कोठून आणले याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली
*या पथकाची कारवाई*
पोलीस निरीक्षक संजय साळुंखे सहाय्यक निरीक्षक सचिन बंडगर नंदकिशोर सोळुंके श्रीनाथ महाडिक फौंजदार शिंदे यांच्यासह हवालदार सुहास आखाडे दिलीप किर्दक अशोक लोखंडे अमित रावडे इमाम इमानदार अजय अडगळे अजय पाडवी संतोष मोरे अंकुश भोसले संतोष फुटाणे संदीप जावळे विजयकुमार वाळके राजेश चव्हाण श्रीकांत पवार अनिल जाधव शीतल शिवशरण सचिन बाबर विनायक बर्डे राहुल तोगे कृष्णात तेली महेश शिंदे तात्यासाहेब पाटील शंकर मुळे विद्यासागर मोहिते कुमार शेळके राजकुमार पवार अजिंक्य माने गणेश शिंदे उमेश सावंत राजू मुदगल सुहास अर्जुन, निलेश शिरूर अजय गुंड सनी राठोड रणजित परीहार ठोकळ गुंड काकडे ढेकणे या पथकाने कारवाई केली

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here