माढा विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी जोडणाऱ्या ४१ कि.मी. रस्ते काँक्रिटीकरण कामासाठी ७७ कोटी रुपये मंजूर:आ.बबनदादा शिंदे
माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावातील एकूण 41.500 किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2, संशोधन व विकास अंतर्गत 77 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून ही कामे तातडीने सुरू होतील अशी माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
वृत्तांत असा की रणजीतसिंह शिंदे यांचा माढा मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून मतदार संघातील कांहीं गावांच्या रस्त्यांसाठी तेथील नागरिकांनी काँक्रीट रस्ते करण्याची मागणी केली असता रणजीतसिंह शिंदे यांनी आमदार बबनदादा शिंदे यांचे शिफारशीनुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा- २ माध्यमातून माढा तालुक्यातील 4, माळशिरस तालुक्यातील 1 व पंढरपूर तालुक्यातील 4, असे एकूण नऊ ठिकाणच्या 41.500 किलोमीटर लांबीच्या कामासाठी 77 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
रस्त्याचे नाव…. माढा तालुका…
१) वडशिंगे-दारफळ-अंजनगाव उमाटे रस्ता
14. 200 किलोमीटर, रक्कम 30 कोटी 34 लाख रुपये २) टेंभुर्णी ते नागोर्ली 3.400 किलोमीटर ,6 कोटी 36 लाख रुपये, ३)परिते- आहेरगाव रस्ता
4.800 किलोमीटर 9 कोटी 29 लाख रुपये ४) टेंभुर्णी – सुर्ली रस्ता 1.650 किलोमीटर, 2 कोटी 50 लाख रुपये .
पंढरपूर तालुका१) शेवते ते पेहे रस्ता 4.500 किलोमीटर 9. कोटी 26 लाख रुपये, 2,) होळे ते कोकनदी रस्ता 3 किलोमीटर, 4 कोटी 23 लाख रुपये 3) पांढरेवाडी ते चिलाईवाडी रस्ता ४.६०० किलोमीटर, ०५ कोटी ९६ लाख रुपये 4) देशमुख वस्ती चव्हाण वस्ती ते कान्हापुरी ३.५०० किलोमीटर ,३ कोटी २५लाख रुपये .
चौकट
माळशिरस तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा आणि बरेच दिवसापासून मागणी होत असलेला २३/४ ते लवंग रस्ता ०३ किलोमीटर अंतरास ०५ कोटी ७८ लाख रुपये काँक्रिटीकरण रस्त्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
अशाप्रकारे माढा मतदारसंघातील विविध हे झालं का ठिकाणच्या ४१.५०० किलोमीटर अंतर रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत ७७ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असून लवकरच ही कामे तातडीने सुरू होऊन मार्गी लागतील असेही आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी सांगितले.