बिहार विधानसभेप्रमाणे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाच यश मिळविणार
(अजिंक्यराणा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास)
(बिहार विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल मोहोळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
*पेढे वाटून, फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा)
देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री ना.अमित भाई शहा यांच्या कौशल्यपूर्ण कारकिर्दीमुळे भारताने संपूर्ण जगात प्रगतीची अलौकिक उंची प्राप्त केली आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीसारखे भारतीय जनता पक्षाला देशातील विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळत आहे. अशीच दैदीप्यमान यशाची घौडदौड येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपरिषदांच्या निवडणुकामध्ये मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे निवडणूक प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मोहोळ शहर आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोहोळ नगर परिषदेसमोर फटाके फोडून गुलालाची उधळण करत पेढे वाटले. यावेळी आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा केला याप्रसंगी अजिंक्यराणा पाटील बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष सतीश काळे म्हणाले की महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय महायुतीचे सर्वच विभागाचे मंत्री महोदयांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी पार पाडल्यामुळे राज्यातील जनता निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील यश मिळवून देण्यासाठी पाठीशी खंबीरपणे मतदानाच्या रूपात राहील.
एवढी ज्येष्ठ भाजप नेते शंकर नाना वाघमारे यांनी देखील आपले मनोगत आतून भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करत कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अजिंक्यराणा पाटील यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत , चिटणीस महेश सोवनी तालुका अध्यक्ष सतीश काळे, मोहोळ निवडणूक प्रभारी सुशील भैय्या क्षीरसागर, प्रमोद डोके, अंकुश अवताडे, सागर लेंगरे, रुपेश धोत्रे, गौतम क्षीरसागर, तानाजी मेजर माने, प्रशांत गाढवे द्रोणा लेंगरे,विशाल पवार, द्रोणाचार्य लेंगरे, तुळजाराम धोत्रे, संतोष धोत्रे, संतोष सोलंकर, नवनाथ गाढवे, विश्वराज भोसले, विनोद माने, सुनील गाढवे,
अविनाजी पांढरे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुजीब मुजावर, छगन अष्टूळ बिलाल भाई शेख, गणेश झाडे विनोद देशपांडे, संतोष धोत्रे, आधी सर्व मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख सर्व अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

