प्रा. तेजस्विनी कदम यांना आचार्य अँकॅडमी प्रा.लि. बारामती यांच्या वतीने शैक्षणिक पुरस्कार प्रदान!
(दलित मित्र कदम, गुरुजींनी स्थापन केलेली, शिक्षण प्रसारक मंडळ उल्लेखनीय कामगिरी करणारी शिक्षण संस्था आहे:- डॉ अ.ल देशमुख)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आचार्य अँकॅडमी प्रा.लि. बारामती यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रा. तेजस्विनी कदम यांना शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सोहळा राष्ट्रपती पदक विजेते शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत डॉ. अ. ल. देशमुख यांच्या हस्ते व आचार्य अँकॅडमीचे प्रमुख ज्ञानेश्वर मुटकुळे, अजितदादा इंग्लिश स्कूल, बारामतीचे संग्रामसिंह मोकाशी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे संपन्न झाला.
डॉ. देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दलित मित्र कदम गुरुजींनी स्थापन केलेली शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा ही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी एक नामांकित संस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. अशा संस्थेत कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आचार्य अँकॅडमीच्या चालकांचे कौतुक केले.
प्रा. तेजस्विनी कदम यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पुरस्काराने शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक काम करण्यासाठी नक्कीच ऊर्जा मिळेल, असे मनोगत प्रा. तेजस्विनी कदम यांनी व्यक्त करत आचार्य अँकॅडमीच्या टीमचे आभार व्यक्त केले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
