अभिजीत आबा पाटील यांची अशी ही तत्परता!
स्वतःची फॉर्च्यूनर गाडी व इनोवा व बेलोरा गाडी पाठवून देत केली पंढरपूर तालुक्यातील सहकाऱ्यांची मदत!
म्हणूनच अभिजीत आबा पाटील यांच्या पाठीमागे तरुण कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा!
“न भूतो न भविष्यती” असे काम अभिजीत आबा पाटील यांच्याकडून सध्या सर्वच ठिकाणी सुरू असून काल पंढरपूर तालुक्यातील काही अभिजीत आबा पाटील यांचे कार्यकर्ते, देवदर्शनाच्या निमित्ताने गणपतीपुळे, व कोकण दर्शनासाठी गेले होते येताना त्यांच्या गाडीचा सांगोला तालुक्यातील भीषण अपघात झाला. हा अपघात मध्यरात्री एक वाजता झाला असून त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी गाडीची दुरावस्था झाल्यामुळे अनेक खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना फोन करून गाडी पाठवून देण्यासाठी सांगितले पण कोणत्या खाजगी त्यावेळेस कंपनीने त्यांना प्रतिसाद दिला नाही पण अभिजीत आबा पाटील यांना कॉल केल्यानंतर त्यांनी लगेचच ताबडतोब कसला विचार न करता आपली स्वतःची फॉर्च्युनर गाडी एक इनोव्हा चार-पाच बोलेरो गाड्या फक्त अर्धा तासाच्या कालावधीमध्ये पाठवून दिल्या व फोन करून या सर्व कार्यकर्त्यांची आदराने विचारपूस केली. याची एकच चर्चा आज दिवसभर पंढरपूर तालुक्यात सुरू असून अभिजीत आबा पाटील यांचे कार्यकर्ते असणारे सूर्यकांत बागल यांनी एका सोशल मीडिया अकाउंट वरून या सर्व घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की; आपला हक्काचा माणूस म्हणून अभिजीत आबा पाटील यांच्यावर सर्व पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे..