- आमदार देवेंद्र कोठे -चेतन नरोटे वाद पोलिस पर्यंत
(सोलापुरात 3जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या राजकीय टीका आणि आरोपानंतर वैयक्तिक पातळीवर गेलेल्या वादाची भर दिवाळीत सोलापुरात एकच चर्चा आहे. हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत गेला असून भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर जेल रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काँग्रेस प्रसिद्धी सेलचे प्रमुख तिरुपती परकीपंडला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन युवा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना गाढव म्हटल्या वर चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन समोर आमदार कोठे यांच्या विरुद्ध आंदोलन करून प्रतिमेला जोडे मारले होते.
त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिरुपती परकीपंडला यांच्या घरासमोर येऊन आम्ही कोठे साहेब यांचे सांगणेवरुन आलो आहोत. तू आमदार कोठे साहेब यांचे विरूद्ध आंदोलन मध्ये सहभागी होतास व त्यांचे विरुद्ध घोषणा दिल्या होत्या. तुम्ही आमदार साहेब यांचे नादी लागु नका, व नादी लागल्यास परिणाम भोगण्यास तयार रहा असे म्हणाले, तसेच तु तुझे फेसबुक व व्हाट्सअपवर आमदार कोठे साहेब यांचे संबंधीत टाकलेली पोस्ट डिलीट करुन टाक व तु असे नाही केले तर तुला आम्ही बघुन घेतो असे म्हणून मला शिवीगाळ करुन दमदाटी केली.
