शिवसेनेच्या अमोल बापूं’ची कडवी झुंज पराभव झाला असला तरी अमोलबापु शिंदे यांची जिल्ह्यात चर्चा!
(मनाचा मोठेपणा दाखवत बापूंनी दिल्या नूतन संचालक मनीष भैया देशमुख यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या ८७ नगरसेवकांना नडणाऱ्या अमोल शिंदे यांची आता तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा सुरू असून त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नागरी बँका मतदारसंघातून अतिशय कडवी झुंज दिली सहाशे सतरा मता पैकी केवळ २८ मतांनी अमोल शिंदे यांचा पराभव झाला. अमोल शिंदे यांनी तब्बल २८३ मते घेतली. विजयी उमेदवार मनीष देशमुख यांना ३१२ मते मिळाली.
मोहिते पाटलांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलमध्ये अमोल शिंदे यांची एन्ट्री झाली. या निवडणुकीत मनीष देशमुख सुद्धा बिनविरोध होतील अशी चर्चा होती मात्र अमोल शिंदे यांनी आपले उमेदवारी ठेवून त्यांचा समोर तगडे आव्हान दिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक लागलेल्या नऊ जागांपैकी केवळ मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते.
या निवडणुकीत अनपेक्षित पणे अमोल शिंदे यांनी मुसंडी मारली उत्तर सोलापूर मध्ये असलेल्या १६४ मतांपैकी तब्बल ९७ मध्ये अमोल शिंदे यांनी घेतले. यामुळे अनेकांची झोप उडाली. त्यातच दक्षिण मध्ये १४ पैकी सात सात अक्कलकोट मध्ये 21 पैकी 8 करमाळा 20 पैकी नऊ मंगळवेढा 38 पैकी 27 माळशिरस मध्ये ९४ पैकी ५९ अशी मते त्यांनी घेतली मात्र बार्शी माढा पंढरपूर मोहोळ सांगोला येथे मनीष भैय्या देशमुख यांना मताधिक्य मिळाले.
केवळ सोलापूर शहरात संपर्क असलेल्या अमोल शिंदे यांनी जिल्ह्यात मते घेतल्याने ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत पराभव झाला असला तरी त्यांचे चर्चा राजकीय वर्तुळा सुरू आहे माळशिरस मध्ये जर अमोल शिंदे यांना सर्व मते मिळाले असते तर मनीष देशमुख यांची अडचण झाले असती. एक वेळ अनेकांना असे वाटत होते की महापालिकेतील आवाज आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात सुद्धा घुमणार का? शिंदे यांचे कार्यकर्ते प्रचंड आशा लावून होते आणि उत्साही दिसून आले परंतु शेवटच्या क्षणी बापूंचा थोडक्या म्हणजेच 28 मतांनी प्रभाव झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. पराभूत अमोल शिंदे यांनी विजयी उमेदवार मनीष देशमुख यांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत सर्वांचे मने जिंकली.

