गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दामाजी साखर कारखान्यातर्पे श्रध्दांजली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

 

आपल्या देशाची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे ब्रीच कॅडी हाॅस्पीटल मुंबई येथे दि. ६/२/२०२२ रोजी सकाळी ८।१२ वाजता निधन.झाले. देश संपूर्ण शोकसागरात बुडाला. लतादिदीच्या सुरांचा अस्त झाला. त्यानिमित्त दामाजी साखर कारखाना कार्यस्थळावर लतादिदींना श्रध्दांजली.वाहण्याचा कार्यक्रम पार पडला.सुरवातीला लतादिदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शोकसभेला सुरुवात झाली. श्रध्दांलजलीपर मनोगत व्यक्त करताना श्री सोमनाथ वठारे म्हणाले लतादिदींचा आवाज म्हणजे असा सूर पुन्हा होणे नाही. त्या वयाच्या सातव्या वर्षापासून गात होत्या. त्यांनी सोलापूरला पहिला कार्यक्रम सादर केला होता. सोलापूर जिल्हयाबद्दल त्यांना आस्था होती. त्यांच्या निधनाने गायन.क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम शिवाजीपार्क मुंबई येथे झाला..शिवसेना प्रमुख मा।बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर लतादिदींचाच अंत्यविधी.शिवाजीपार्कवर झालेला आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड म्हणाले की, लतादिदींचा आवाज सर्वसामांन्यासाठी देणगीच होती. दैवीशक्ती लाभलेली ती एक देवीच होती। लतादिदींना प्रत्यक्ष शाळेत जावून शिक्षण घेता आले नाही तरी परंतु तिच्या आवाजाने सर्व मानवसृष्टी मंत्रमुग्ध होत असे. ती भारतरत्न या सर्वोच्य पुरस्काराने सन्मानीत झालेली गायन क्षेत्रातील पहिली महिला होती।तिच्या निधनाने गायनक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे।
कारखान्याचे संचालक श्री।राजेंद्र सुरवसे यांनी कारखान्याचे चेअरमन
मा. आमदार श्री.समाधानदादा आवताडे व संचालक मंडळ, तोडणी वाहतुक यंत्रणा, सभासद शेतकरी यांचेतर्पे लतादिदींना श्रध्दांजली अर्पण केली. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले कि, लतादीदी आज आपल्यातुन गेल्या असल्या तरी आवाजाचे माध्यमातुन त्या अजरामर आहेत. देश त्यांना कधीच विसरणर नाही.
त्यानंतर उपस्थित सर्वानी दोन मिनीटे शांत उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली व पसायदानाने कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाकरिता कारखान्याचे संचालक श्री. लक्ष्मण जगताप,  यांचेसह श्री. भारत निकम, प्रभारी कार्यकारी संचालक श्री. रमेश गणेशकर, चिफ केमिस्ट श्री मोहन पवार,कार्यालय अधिक्षक दगडु फटे, सिव्हील इंजिनिअर श्री प्रविण मोरे, स्टोअर किपर श्री उत्तम भुसे, टाईम किपर श्री आप्पासाहेंब शिनगारे,सुरक्षा अधिकारी श्री लक्ष्मण बेदरे, व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here