पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे युवा नेते प्रणव परिचारक यांची सोलापूर जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालकपदी निवड!
(सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संघ व पंढरपूर तालुका सोसायटी मतदारसंघातून झाली बिनविरोध निवड!)
(भाजपच्या व पांडुरंग परिवाराच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण)
(युवा पर्व नवे सर्व या ब्रीदवाक्याप्रमाणे, सोलापूर जिल्हा बँकेत पंढरपूर तालुक्यातून प्रणव परिचारक यांची झाली दमदार एन्ट्री)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सर्व तरुणांचे लाडके युथ आयडॉल तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत, सर्व यंग जनरेशनचे पंढरपूर तालुक्याचे मोठे आकर्षण असणारे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते माननीय प्रणव दादा परिचारक यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली असून, त्यांना सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था व व पंढरपूर तालुका सोसायटी मतदारसंघातून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काम करण्याची संचालक म्हणून संधी मिळाली आहे!
सर्व गोरगरीब जनदलित कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, सदैव काम करण्याची धडपड असणारे नेतृत्व म्हणून प्रणव दादा परिचारक यांच्याकडे पाहिले जाते! पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासात्मक क्षितिजावर आरुढ असणारे, आपल्या कामातून सर्वांना शिस्त लावणारे व सर्व तरुण वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव आणि तत्पर देणे काम करणारे नेतृत्व म्हणून प्रणव दादा परिचारक यांच्याकडे पाहिले जाते! स्वर्गीय कैलासवासी सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या राजकीय सामाजिक व सहकारातील असणारा मोठा अनुभव जवळजवळ, ३५ ते ४०वर्ष संचालक म्हणून त्यांनी केलेले काम त्याचबरोबर माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांची सावली सारखी असणारी खंबीर साथ व ज्यांची सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ओळख आहे असे पांडुरंग परिवाराचे नेते किंग मेकर म्हणून ज्यांना संबोधले जाते असे उमेश मालक परिचारक यांचे असणारे मोलाचे मार्गदर्शन, या सर्वांच्याच आशीर्वादाने प्रयत्नाने आज पंढरपूर तालुक्यातील एक युवक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून गेल्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही त्यांच्या असणाऱ्या विश्वासाचा मार्ग या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे! दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, युरोपियन शुगर्स, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर पंचायत समिती याचबरोबर अनेक संस्थांवर असणारे त्यांचे बलाबल पाहता प्रणव दादा परिचारक यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी पंढरपूर तालुका सोसायटी मतदारसंघातून निवड ही खूप मोठी सुवर्णसंधी मानली जात आहे!
या संचालक पदाच्या निवडीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी व चालना मिळणार असून पंढरपूर तालुक्यातील नवतरुण होतं करू नवव्यवसायिकांना याचा नक्कीच लाभ होणार असल्याचे यावरून दिसून येत आहे! ऊस उत्पादक व द्राक्ष उत्पादक डाळिंब उत्पादक व नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही आजपर्यंत त्यांची सर्वात मोठी आर्थिक वाहिनी म्हणून ओळखली जात होती इथूनही पुढे प्रणवदादा परिचारक यांच्या निवडीमुळे, याला चांगल्या पद्धतीने गती येणार आहे!
या संचालक पदाच्या निवडीमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील नवतरुण सर्वच भारतीय जनता पार्टीच्या व पांडुरंग परिवाराच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी आज मोठा आनंदोत्सव साजरा केला आहे, कार्तिकी वारीच्या पवित्र अशा महाप्रवाहामध्ये, भारतीय जनता पार्टी व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार जी गोरे भाऊ यांच्या आशीर्वादाने हे, या संचालक पदी बिनविरोध निवडी बद्दल सर्व स्तरातील सर्वच भागातील जिल्ह्यातील पांडुरंग परिवारावर व परिचारक कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांकडून प्रणव दादा परिचारक यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे!
