*मा.प्रशांतमालक परिचारक यांनी चुटकीसरशी सोडवले सर्व गोपाळपूरातील प्रश्न!*
*(युवा नेते सतिशदादा लेंगरे व युवा नेते बबलू महाराज आसबे मित्र परिवाराने गोपाळपुरातील*
*प्रश्न मार्गी लावण्यामध्ये बजावली महत्त्वाची भुमिका)*
*(आगामी काळात गावातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही मा. प्रशांत मालक व प्रणव दादा परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार:- सतिश दादा लेंगरे)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सोलापूर जिल्ह्याचे नेते मा.आ.श्री प्रशांत मालक परिचारक यांनी आज पंचायत समिती पंढरपूर येथे जनता दरबार व तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गोपाळपूर गावातील सर्व नवतरुण युवकांनी एकत्र येत माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांना गावातील विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले! तात्काळ या निवेदनाची दखल घेत प्रशांत मालक परिचारक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांमध्ये कडक सूचना देऊन, काम मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये गोपाळपूर येथील युवा नेते सतिश दादा लेंगरे, बबलू महाराज आसबे याचबरोबर इतर सर्व तरुणांनी एकत्र येत वाजवी प्रश्न उपस्थित करून समस्या मांडल्या यामध्ये प्रामुख्याने, जिल्हा परिषद शाळा लेंगरे वस्ती दुरुस्ती करणे, गोपाळपूर चौक येथे रोडवरती झेब्रा क्रॉसिंग करणे, जल जीवन मिशन अंतर्गत गावातील सर्व नागरिकांना पाणी चालू करणे; नवीन आर, ओ, प्लांट चालू करणे कृष्णाच्या मंदिराजवळील, याचबरोबर गावातील सर्व नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळणे या व अनेक अशा विविध मागण्या यावेळी सर्व या नवतरुणांनी मांडल्या असून, याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सूचना यावेळी माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी दिल्यामुळे सर्व स्तरातून या सतीश दादा लेंगरे, या व त्यांच्या सर्व टीमचे कौतुक करण्यात येत आहे!
