*सदस्य चरणराज चवरे यांच्या निधीतून शेंबडे-जुदगार वस्ती रस्त्याच्या मजबुती करणाच्या कामाचा शुभारंभ!*
*१५ व्या वित्त आयोगातून मंजूर रस्त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर होणार!*
*तर तालुक्यात प्रथमच शेतकरी महिलांच्या हस्ते कामाचे करण्यात आला कामाचा शुभारंभ!*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेते चरणराज चवरे यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेल्या जुदगार वस्ती ते शेंबडे वस्ती जोडरस्ता मजबुतीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आज श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला.
जेसीबीच्या साक्षीने व तालुक्यात प्रथमच शेतकरी महिलांच्या हस्ते म्हणजे रंजना ज्ञानदेव शेंबडे,सोनाली लक्ष्मण शेंबडे या महिलेंच्या हस्ते नारळ फोडून या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला.अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे शेतकरी, द्राक्ष बागायतदार आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. द्राक्ष काढणी, तोडणी, उतरणी तसेच बेदाणा निर्मितीसाठी लागणारा शेतमाल आणि इतर कृषी उत्पादने बाजारपेठेत पोहोचविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे या रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती.
चरणराज चवरे यांनी या प्रश्नाची दखल घेत निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यास तुकाराम शेंबडे सर,डॉ. प्रवीण शेंबडे, बाळासाहेब भोसले, बाळू गवळी, अगतराव खराटे, शिवाजी जुगदार, धनाजी शेंबडे, काकासाहेब माने, तानाजी शेंबडे, बाबुराव चवरे, बापू शेंडे, सुभाष शेंबडे, आबा गायकवाड, तानाजी चवरे, माऊली शेंबडे, बालाजी चवरे, अमोल चवरे, चिंतामणी माने, लक्ष्मण शेंबडे, सुजित आवारे, अण्णासाहेब चवरे, मोहन शेंबडे, प्रशांत शेंबडे, संग्राम शेंबडे, विजय शेंबडे, नेताजी जाधव, धनाजी चवरे, अजिंक्य चवरे, पपू शेंबडे, अजित शेंबडे, आकाश माने, विजय चवरे, बलभीम राजगुरू, बाळू शेंबडे, संभाजी शेंबडे, समाधान शेंबडे, अर्जुन शेंबडे, राजेश माने, वासुदेव शेंबडे, नागराज शेंबडे, श्रीराम माने, श्रीदत्त शेंबडे,सज्जन खराटे,आकाश चवरे, कारण काळे, किरण चवरे,विठ्ठल माने,सुनील अनुसे,अरुण रणदिवे,अनिल पवार तसेच स्थानिक शेतकरी बांधव, महिला भगिनी, ग्रामस्थ तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*चौकट*
*माता भगिनींच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले याचा खूप मोठा आनंद आहे, नेते मंडळीला आणून उद्घाटन करण्यापेक्षा माझ्या शेतकरी मायबाप जनतेच्या हस्ते उद्घाटन केले याचा सार्थ अभिमान आहे!*यावेळी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी, कामातून उत्तर देणारा नेता म्हणजे चरणभाऊ. हा रस्ता* *झाल्यामुळे आमचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटणार आहे!* *अशी भावना व्यक्त केली
लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो सर्वांसाठी खुला होणार असून, या कामामुळे शेंबडे व जुदगार वस्तीतील नागरिकांच्या दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.
