“व्हाय आय किल्ड गांधी” हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये, अन्यथा युवक कॉंग्रेस तर्फे तीव्र आंदोलन :- अंबादास बाबा करगुळे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारा चित्रपट “व्हाय आय किल्ड गांधी” या चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांची हत्या करणाऱ्या हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस व युवक काँग्रेसने या चित्रपटाविरोधात आक्रमक झाली असून या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करत आहोत. महात्मा गांधींची हत्या झाली याच दिवसाचे औचित्य साधून कडव्या विचाराचे चित्रपट निर्माता व्हाय आय किल्ड गांधी हा चित्रपट प्रदर्शित करत आहेत. महात्मा गांधींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या भारत देशाची ओळख महात्मा गांधींच्या नावाने होते. सत्य, अहिंसा, आणि सत्याग्रह या शास्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे गांधींनी आपल्या लढ्यातून दाखवून दिले आहे. म्हणूनच ते संपूर्ण जगभर परम पूजनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस एकटा, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. दुसरीकडे अशांतता, द्वेष, आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा व्हाय आय किल्ड गांधी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. परंतु यामुळे फॅसिस्ट वृतीला बळ मिळेल. म्हणून कोणत्याही घृणास्पद, अमानवीय कृत्याचे उदात्तीकरण भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. नथुरामाचे उदात्तीकरण करणारा हा चित्रपट सोलापुरात कोणत्याही चित्रपट गृहात आणि ओटीटी प्लॅटफॉमवर प्रतिबंधित करण्याबाबत युवक काँग्रेस मागणी असून ती मान्य करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी बोलताना प्रदेश युवक सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की, केंद्रामध्ये भाजप सरकार आल्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व इतर थोर महापुरुष यांची बदनामी करण्याच्या प्रयत्न सुरु आहे. गांधीजी यांच्या मारेकरी नथुरामाचे पूजा करणे किंवा त्याचे मंदिर बांधणे असे प्रकार करून गांधी विचार पुसून टाकण्याचा जातीयवाद्यांचा प्रयत्न आहे. भाजपचे मूह मे राम बगल मे नथुराम असे धोरण असून कलेच्या अभिव्यक्तिखाली नथुरामाचे उदात्तीकरण खपवून घेण्यात येणार नाही. “व्हाय आय किल्ड गांधी” चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये.

यावेळी उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना युवराज जाधव कार्याध्यक्ष युवा नेते वाहिद विजापुरे राजासाब शेख, प्रवीण जाधव तिरुपती परकीपंडला, राहुल वर्धा, महेश लोंढे, राहुल गोयल, अनिल मस्के, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, दीनानाथ शेळके, राजेंद्र शिरकुल, विवेक इंगळे, शाहू सलगर, नरेश येलूर, मल्लूबाबा म्हेत्रे, आकाश गायकवाड, आप्पाजी गायकवाड, शिव कोरे, कपिल माशाळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here