*चंद्रमोळी औद्योगिक वसाहती मधील कंपनीतील प्रदूषणाला अखेर बसणार चाफ!*
*(ग्लेनमार्क केमिकल कंपनी तसेच मिल्क प्रोसेस युनिटवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची सक्त कारवाई)*
*(लोकसभा संपर्कप्रमुख प्रियंका ताई परांडे यांच्या पाठपुराव्यामुळे कंपनीला लागले कुलुप)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सद्यस्थितीमध्ये चालू असलेल्या सर्वच क्षेत्रातील भेसळ पाहता,सर्वच ठिकाणाचे प्रदूषण पाहता खरच चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवण्याची खऱ्या अर्थाने गरजेचे आहे!अशातच मागील १५ दिवसांपूर्वी शिवसेना युवासेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख प्रियांकाताई परांडे यांनी मोहोळ येथील चंद्रमोळी औद्योगिक वसाहत येथील सुरू असलेल्या कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ग्लेनमार्क केमिकल कंपनी,तसेच मिल्क प्रोसेसिंग यूनिट आणि इतर केमिकल कंपन्याच्या विरोधात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली असता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.त्वरितच प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित पाहणी केली व आढळून आलेल्या त्रुटी पाहता कारवाई केली.
उद्योगातून निर्माण होणाऱ्या घरगुती सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटींकरिता चंद्रमोळी औद्योगिक वसाहतीस आदेश बजावण्यात आलेला आहे.त्यातील ३ डेअरी उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश बजावण्यात आले आहेत तसेच ५ उद्योगांना सांडपाणी त्रुटीबांबत आदेश बजावण्यात आले आहेत.ही कारवाई कायदा जल (प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण)कायदा १९७४,हवा(प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण)कायदा १९८१ अंतर्गत करण्यात आलेली आहे.
