जेभाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचा तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्याकडून सन्मान!
(जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्यासह, अनेकांनी घेतली आमदार योगेश (आण्णा) टिळेकर यांची सदिच्छा भेट)
भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. श्री. योगेश (अण्णा) टिळेकर साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर विश्रामगृह येथे भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत नाना चव्हाण यांच्या समवेत मोहोळ दक्षिणमंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, मोहोळ उत्तर मंडल भाजपा अध्यक्ष सतीश काळे, उत्तर सोलापूर मंडल भाजपा अध्यक्ष संभाजी दडे, युवा नेते सुदर्शन यादव, ओबीसी जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष बालाजी वाघमारे, अतुल पवार, विशाल चौधरी, यशवंत नामदे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
