*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!*
*(खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कुरूल येथील रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल (ता. मोहोळ) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल 67 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
खासदार धनंजय जी महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, मोहोळ विधानसभा अध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
रक्तदान हे सर्वोच्च दान मानले जाते. या शिबिरातून संकलित झालेले रक्त अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगी पडणार असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
यावेळी उपस्थित कुरुल जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन जाधव दक्षिणमंडलांचे तालुकाध्यक्ष रमेश माने उत्तर मोहन मंडलाध्यक्ष सतीश काळे विकास जी वाघमारे प्राध्यापक माऊली जाधव, बाबासाहेब जाधव, प्रताप पाटील, किरण जाधव, प्रसन्न जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे राहुल धोत्रे प्रसाद जाधव रुपेश पाटील किरण जाधव गाव कामगार पोलीस पाटील वैभव जाधव संतोष कडबने पृथ्वीराज जाधव आकाश जाधव दयानंद जाधव सोन्याबापु जाधव, महेश कुलकर्णी सुभाष शिंदे विकास जगताप महेश वाघमारे अक्षय जाधव बालाजी जाधव प्रकाश जाधव बाळासाहेब भालेराव रक्तदात्यांचे अभिनंदन करत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव आणि जनजागृती वाढीस लागते, असे मत व्यक्त केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.
