इंदापूरच्या पत्रकार संघाने मोठी भरीव कामगीरी केली आहे- प्रा.लक्ष्मण ढोबळे,माजी मंत्री

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

6 जानेवारी टोकदार शब्दांचा दिन तर दर्पणकारांचा जन्मदिन. कारण दर्पणचा पहिला अंक 1832 ला सुरू झाला. मोठ्या कष्ठाने कधी कधी स्वतःच्या खिशातून खर्च भागविला. आठ वर्षे चालविला. आणि 1840 साली दर्पणकारांचा अंक थांबला. रामाच्या श्रद्धेने वानरांनी पहिला सेतू बांधला. तसे वंचितांच्या, गरिबांच्या वेदनेला वाट करून देण्यासाठी दर्पणकारांनी व्यासपीठ निर्माण करून दिले. पहिले वृत्तपत्र म्हणून, पहिले दर्पण म्हणून 19 व्या अर्धशतकाचा समारोप दर्पणकारांच्या तडाखेबाज बातम्यांनी, वृत्त माध्यमांनी गाजविला. त्याला देवाच्या गाभाऱ्याचे पावित्र्य होते. आज मोठे बदल झाले असून हातातला मोबाईलच बातम्यांचा हेडमास्तर झाला आहे. तर इंटरनेटच्या नांगरटीने अवघे समाजमन रोटरून निघाले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी मोठ्या कष्ठाने, निरिक्षणाने, सेव्हन डब्ल्यु ने सतत प्रसार माध्यमाची परंपरा आणि चळवळ जिवंत ठेवली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीता आणि तिची चळवळ चौथ्या स्तंभाची कामगीरी बजावणारे पत्रकार कौतुकास पात्र आहेत. तर सफाई कामगार माय बहिणीच्या ओटीला पैठण देऊन साजरे झालेले रक्षाबंधन अधिक मोलाचे आहे. सफाई कामगाराच्या हिताचे निर्णय घेणारी नगरपालिका कौतुकाला पात्र आहे.
          कार्यकारी मंडळ, न्याय पालिका, कायदे पारित करणारे विधीमंडळ आणि पत्रकारीतेचा चौथा स्तंभ असून या चार स्तंभावरच वृत्त माध्यमांचा वसा आणि वारसा रसिक वाचकांनी जोपासला आहे. अर्थात लोकशाहीचा डोलारा जतन केला आहे. त्याच बरोबर ऊसाला दर द्यावा, साखरेला भाव द्यावा, दुधाची योग्य किंमत मिळावी यासाठी अनेक वृत्तपत्रांनी उपेक्षित शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा सडेतोडपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच प्रिंट मिडीयाची भल्यापहाटे वाट पाहतात. तर चार पानाचा नवाकाळ असो अगर सोळा पानाचा सकाळ असो मोठ्या चवीने रसिक वाचक चोखंदळ वृत्तपत्राचे स्वागत करतात. तर बातमीच्या स्पर्धेत कोणते वृत्तपत्र सरस ठरते याबद्दलची कानातली चर्चा ऐकायला मिळते. गोविंदराव तळवळकर या संपादकाचे अग्रलेख त्या काळात गाजले होते. !! वेडात दवडले !! वीर मराठे सात!!  याच बातमीने  सरकारमधल्या सात जणांनी बंड केले होते तर याच खळबळजणक बातमीने सरकार पडले होते. मोलकरीण बोलते, कामगार बोलतो, त्याची बातमी होत नाही. परंतु पत्रकाराने खात्री केली की माध्यमात जागा मिळते आणि त्याची बातमी होते. ओबीसीच्या आरक्षणाचा विषय टोकदार झाला की लोक ओदांलनाची तयारी करतात. खरा ओ.बी.सीचा मारेकरी कोण याबद्दलची चर्चा होत रहाते. कारण ऊस तोड कामगारांची वेदना मांडल्यामुळे बेदरकार थंड डोक्याचा चेअरमन सावधपणाने वागतो. तर लोकप्रतिनिधीचे बुद्धीवैभव डोक्यातून गाडीतून, गळ्यातून क्वचितच बोटातून मनगटावर व्यक्त होत असते. कारण ब्रेसलेट आणि डोळ्यावरचा रेबॉन हेच नव्या आमदाराचे वैभव असते. अर्थात बुद्धी वैभव कमी झाले की चमकोगीरी वाढत जाते. त्यातूनच तिन पक्षाच्या सरकारात 4 लाख 84 हजार 91 कोटी रूपये वार्षीक बजेट पक्षीय बळावर वाटले जाते. चांगली खाती बळकावल्या मुळे दोन लाख कोटी रूपये राष्ट्रवादीकडे आले. तर मुख्यमंत्र्याचा वावर विचारात घेता दिड लाख कोटी रूपये शिवसेना मंत्र्याकडे तर उरलेले 1 लाख कोटी रूपये धर्मनिरपेक्ष काँग्रेस मंत्र्याकडे उपलब्ध झाले. आणि राहिलेली उर्वरित रक्कम आघाडी सरकारला साथ देणाऱ्या इतर सहकारी मंत्र्यांना देण्यात आली आहे. शेवटी निधी आणि मंत्री पदाचे वाटप हे पक्षाच्या वकुबावर आणि कर्तबगार मंत्र्यावर अवलंबून असते. हे सारे महत्वाची माहिती पत्रकारच मोठ्या कष्टाने लोकापर्यंत पोहोचवत असतात.
          अस्तित्वातले कल्याणकारी राज्याचे पक्ष म्हणून शिवरायाचे स्मरण करून वाटचाल करणारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असे दोन पक्ष आहेत. तर गांधीबाबाचे स्मरण करून वाटचाल करणारे पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी असे पक्ष वाटचाल करीत आहेत. तर डॉ.आंबेडकरांचे स्मरण करून वंचित आघाडी रिपब्लिकन पक्ष आणि इतर पुरोगामी चळवळी राज्यात काम करीत असतात. यामध्ये शिवरायाचे स्मरण करून काम करणाऱ्या संघटनांचे कमळ वाढले तर धनुष्य बाण लहान होतो. जर धनुष्य बाणाचा आकार वाढला तर कमळ लहान होते. गांधीबाबाच्या विचाराचे स्मरण करून वाढणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांची जागा व्यापत असतात. तर बाबासाहेबांचे स्मरण करून वाढणारे पक्ष वंचित आघाडी वाढली तर रिपब्लिक लहान होते. तर रिपब्लिक वाढला तर वंचित आघाडी लहान होते. सर्वच पक्षातून व्यक्त होणारी तळमळ ऊसातली रिकव्हरी असो, साखरेतला दर असो, शेतकऱ्यांची एफ.आर.पी अगर कामगारांचा पी.एफ असो मोठ्या तळमळीने पोटतिडकीने गरीबांची वेदना सर्वच पक्ष मांडत असतात. तर लखनौचे नबाब मलिक केवढ्या कष्टाने हरबल तंबाखुच्या हिरव्या पानावर बोलत असतात. त्यातूनच अनेक पक्षांचे विस्तार होत असतात.
          कृष्णराव धुळप, हषू आडवाणी, राम कापसे, राम नाईक, मृणाल गोरे या लोकांनी लेटरेचर इज क्रिटीसिझम अप लाईफ या भावनेने पत्र सृष्टीकडे पाहिले. त्यामुळे खेड्यातला आणि विधानसभेतला सुरू, खोडवा, निडवा पत्रकार लेखणीने राज्यासमोर मांडला. त्यामुळेच वान बांबूचा असो अगर वान ऊसाचा असो तसेच वान हरबल तंबाखूचा असो एका रात्रीत संपत्तीने मोठे करणारे पिक कोणते याच्या शोधात शेतकरी आणि कार्यकर्ता असल्यामुळे   पक्षाच्या जाहिरनाम्यात देखील हरबल तंबाखूचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. वृत्तपत्र सृष्टी मध्ये कागदाच्या वाढत्या भावाने जाहिरातीत गुदमरलेल्या पेपरला श्‍वास घेणे देखील अवघड झाले आहे. वर्तमान पत्राचे मोठे गृप देखील मोठ्या कष्टाने महिना अखेरचा मेळ घालत असतात. एकूणच प्रिंट माध्यम, गुगल, फेसबूक, व्हाट्ॲप, ट्विटर यामध्ये मोठ्या जोमाने टिकून आहे. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर बातम्याचे बदलते संदर्भ भल्या सकाळी लोकांच्या हातात बातमी देणारे वृत्तपत्र तर सेव्हन डब्ल्युने घटनेला प्रश्‍न विचारून घडत्या घटनांचे संदर्भ देणारे वृत्तपत्र. इंदापूरच्या पत्रकार संघाने अतिशय भरीव कामगीरी केली असून इंदापूर पत्रकार भवनाची मागणी अधिकच टोकदार झाली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here