
सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड टाकळी सिकंदर येथील रस्त्यांची केली पोल खोल!
(ठेकेदारांसह ग्रामपंचायतीवर अक्षय गायकवाड यांनी केले गंभीर आरोप)
निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार: अक्षय गायकवाड
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील एका केलेल्या निकृष्ट दर्जाचे रस्त्याच्या कामाची सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड यांनी पोल खोल केली आहे.
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील सन 2023-2024 सालामध्ये अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटक योजनेअंतर्गत दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत गायकवाड वस्ती ते पोहोच रस्ता कॉंक्रीटीकरणासाठी 9 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.
तरी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केला आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड यांनी संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्याकडे सविस्तर पाठपुरावा केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत तरी या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा उद्याच्या १३/०३/२०२५रोजी टाकळी सिकंदर येथील कॅनॉल मध्ये जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड यांनी दिला आहे.