न्यु सातारा पॉलीटेक्निकचा रिऍलिटी सॉफ्टवेअर सर्विसेस एल. एल.पी. या कंपनीसोबत सामंजस्य करार
कोणत्याही फॉरवर्ड थिंकिंग फर्मसाठी ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही एक बुद्धिमान गुंतवणूक आहे.
सध्याच्या काळात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही एक महत्त्वाची औद्योगिक कला आहे. जी सर्वच ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस उद्योग, औद्योगिक, आर्किटेक्चरल डिझाइन, आय टी सेक्टरमध्ये आणि इतर अनेक अनुप्रयोगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. चित्रपट, जाहिराती आणि तांत्रिक मॅन्युअलमध्ये विशेष प्रभावांसाठी संगणक ॲनिमेशन तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचाच मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून न्यु सातारा मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निकचा रिऍलिटी सॉफ्टवेअर सर्विसेस एल. एल. पी. या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी व उद्योग याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आय टी सेक्टरच नव्हे तर विविध क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे असे यावेळी संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच या संदर्भात बोलताना प्राचार्य लोंढे म्हणाले की, हे प्रशिक्षण कॉम्पुटर इंजीनियरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग या विभागातील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. तसेच शिक्षकांनाही या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे कार्यशाळा ,गेस्ट लेक्चर व इन प्लांट ट्रेनिंग सुद्धा देण्यात येणार आहे, तसेच हे प्रशिक्षण स्वतः कंपनीचे मालक सचिन अनुसे यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भविष्यामध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये फार मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांच्या अथक प्रयत्नातून हा करार करण्यात आला.
हा करार करतेवेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.