
माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी येथे निरा उजवा कॅनॉलच्या पाण्यामध्ये आढळला मृतदेह!
सदरील मयत इसमाची ओळख पटल्यास, माळशिरस पोलीस ठाण्याचे पोहेकाॅ एस,टी घोगरे यांचे संपर्क साधावा!
माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे भांबूर्डी येथे निरा उजवा कॅनॉलचे पाण्यात दिनांक १०/०१/२०२५ रोजी बेवारस पुरूष जातीचे अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा इसम मृत अवस्थेत आढळून आला.
त्याबाबत माळशिरस पोलीस स्टेशन मध्ये बेवारस मयत आकस्मित मृत्यू नोंद दाखल करण्यात आली आहे.
त्याची पाहणी करून मृतदेहाबाबत खात्री करून पोलीस ठाणेस अकस्मात बेवारस मृत्यू बाबत पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला आहे म्हणून प्राथमिक माहिती आहे.
तरी सदर या बेवारस मयताचे नाव पत्त्याबाबत व त्याचे नातेवाईकांचा शोध सुरू आहे. वरील वर्णनाची व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास माळशिरस पोलीस स्टेशन येथे एस.टी.घोगरे 9011534491 यांना संपर्क साधावा असे आवाहन माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.