
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडून सुनील रावसाहेब चव्हाण यांचे अभिनंदन!
(भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या संघटन परवा मध्ये 1000 च्या पुढे सदस्य नोंदणी केल्याबाबत केला त्यांचा गौरव)
(मोहोळ तालुकाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवल्याबाबतही केले बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन)
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये व देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई जी मोदी यांनी राबविलेल्या भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये, सदस्य नोंदणी अभियानात संपूर्ण मोहोळ तालुक्यात 1000 च्या पुढे सदस्य नोंदणी करून भारत देशाच्या पुननिर्माणाच्या प्रवासात सहभागी केल्याबाबत तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांचे पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी अभिनंदनपर पत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे..
भारतीय जनता पक्षाच्या धोरण तळागाळातील जनमानसापर्यंत, पोचवल्याबाबत पक्षाप्रती असलेली बांधिलकी व निष्ठा अधोरेखित होते व या सर्व समर्पित योगदानाबाबत पक्षाध्यक्ष म्हणून मला सार्थ अभिमान आहे. असे पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विशेषता मोहोळ तालुक्यात संघटन बांधणी करून अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षाच्या सर्व ध्येयधोरणे व उपाय योजना व चांगल्या पद्धतीने पोचवून पक्ष वाढवल्याबाबत सुनील चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना आज पक्षाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून अभिनंदनपर पत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या शिरपेच्यात मानाचा तुरा लावला गेला आहे याबाबत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..