आंब्याच्या खोक्यातून करण्यात येणारी चोरटी दारू जप्त.
30 लाख 71 हजार ऐवज तब्यात, चार जण अटक दौंड उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.
दौंड गोव्यात तयार करण्यात येणारी व विक्रीस परवानगी असणारी दारू अहमदनगर कडे अवैधरित्या नेत असताना दौंड विभाग उत्पादन शुल्क पथकाने पकडली.यामध्ये दोन चार चाकी वाहने, दोन मोबाईल सेट आणी दारू एकूण ऐवज 30 लाख 71 हजार रुपये जप्त करण्यात आली असून चार लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती दौंड उत्पादन शुल्क पथकाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे.
या कारवाईत नामदेव हरिभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे आणी महेश गुलाब अवताडे सर्व जण रा. अहमदनगर यांना अटक करण्यात आलि आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,
मोरगाव सुपे रस्त्याने चार चाकी वाहनातून चोरटीदारू नगरकडे विक्रीसाठी नेण्यात येणार आहे. अशी माहिती दौंड उत्पादन शुल्क पथकास मिळाली.याची दखल घेऊन 16 जुन रोजी मोरगाव जवळील मूर्ती गावच्या हद्दीत हॉटेल सानिका जवळ दोन चारचाकी वाहने उभी असलेली आढळून आली. त्यांच्या चालकाकडे चौकशी केली असता ते समाधान कारक उतरे न दिल्याने त्यांची वाहने बाजूला घेऊन कसून चौकशी केली. दोन्ही चारचाकी वाहणाची.तपासणी केली. या एम्.अच.16 /सी. डी. बोल 5419 बोलेरा पिकअप आणी. एम्.अच.12 / ए म.ए फ. 6575 हुंदाई क्रेता या वाहणार आंब्याच्या लाकडी खोक्यात विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यामध्ये दारू, दोन चारचाकी वाहने किमत 12 लाख, 61 हजार, दोन मोबाईल सेट असा एकूण ऐवज.30 लाख 71 हजार ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्येवर महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1944 नुसार कलम 65 चा 80, 81, 83, 90, आणी 108 नुसार करवशी करुंन दोन्ही वाहणातील चौघेजण अटक करण्यात आले आहेत.
ही कारवाई .राज्य उत्पादन पुणे विभाग संचालक डॉ
विजय सूर्यवंशी, पुणे जिल्हा उपायुक्त सागर धनकर, पुणे विभाग अधीक्षक चरणसिंग.रजपूत, उपाधीक्षक उत्तमराव शिंदे , सुजित पाटील, संजीव जगदाळे यांचे मार्गदर्शना खाली दौंड विभाग निरीक्षक.विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक झुंझूरख, पोलीस कर्मचारी शुभम भोईटे, केशव.वामने, नवनाथ पदवलं, अशोक पाटील , चंद्रकांत इंगळे यांनी यामध्ये भाग घेतला.