सोलापूर शहरातील महिला व विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास सुविधा देण्यात यावी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला यांची परिवहन उपक्रमाच्या बजेट सभेत मागणी)

आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची बजेट सभा महापालिकेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झाली. यावेळी परिवहन उपक्रमाची सुधारित 21-22 व 22-23 चे बजेट सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे प्रभारी व्यवस्थापक श्री. संकेत लिगाडे यांनी सादर केले.

या बजेट सभेत परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला यांनी सुचना व शिफारसी केल्या.

सोलापूर शहरात बहुसंख्य महिला कामगार वर्ग असून यामध्ये विडी कामगार, बांधकाम कामगार, असंघटित कामगार, नोकरवर्ग, विद्यार्थी व सर्व महिलांना मोफत बस प्रवास देण्यात यावे.

सध्या फक्त सोलापूर शहरात 25 ते 30 बस सुरू असून सोलापुरातील 12 लाख लोकसंख्येसाठी प्रवासी सेवा देण्यासाठी 50 नवीन CNG किंवा इलेक्ट्रिक बस घेण्यात यावे.

परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून पगारीसाठी तरतूद करावी. त्याचप्रमाणे कामगारांचे देय रक्कमा, फंड, कोर्टाचे देणी इतर देणी यासाठी रकमेची तरतूद करावी.

परिवहन उपक्रमाकडील कर्मचारी सेवानिवृत्त होताना देय रकमांपैकी एकरकमी वीस हजार रुपये ऐवजी पन्नास हजार देण्यात यावे.

परिवहन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व महागाई भत्ता देण्यात यावा.

परिवहन उत्पन्न वाढी साठी प्रयत्न करणे.

अश्या सूचना मांडल्या आणि त्या मा. परिवहन समितीने स्वीकारल्या. परिवहन उपक्रमाचा विचार करता सर्वानुमते बजेट पारित केले.
यावेळी सभापती जय साळुंखे, सदस्य गणेश साळुंखे, अशोक यंनगंटी, नागनाथ शिवशिंगवाले, बाळासाहेब आळसंदे, तसेच परिवहन उपक्रमाकडील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here