फॅबटेकच्या सायली कांबळे  या विद्यार्थिनीची एम्फासीस कंपनीमध्ये  निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील  सायली कांबळे  या विद्यार्थिनीची  एम्फासीस कंपनीमध्ये  निवड झाली असून तीला ३.२ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.

एम्फासीस हि आयटी सेक्टर मधील अग्रगण्य कंपनी असून हि कंपनी सिक्युरिटी टेस्टिंग, मोबाईल अँड क्लाऊड,  अँप्लिकेशन टेस्टिंग  सह  सॉफ्टवेअर व सर्विसेस   पुरविण्याचे काम करते. या कंपनी मध्ये निवड प्रक्रियेसाठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत  ट्रेनिंग दिल्यामुळे  विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाले आहे. याचा फायदा  निवड प्रक्रिये मध्ये विद्यार्थ्यांना होत असल्याचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख  प्राध्यापक सी.एच मल्लारेड्डी यांनी सांगितले.

फॅबटेक  अभियांत्रिकी  महाविद्यालय हे  विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या  कंपन्यांमध्ये निवड करण्यासाठी सतत  प्रयत्नशील   आहे. असे संस्थेचे चेअरमन  मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.निवड झालेल्या या  विद्यार्थ्याचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, संचालक  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख  प्राध्यापक सी.एच मल्लारेड्डी, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर, पदवीचे प्लेसमेंट कॉ-ऑर्डिनेटर प्रा. शैलेश इटकलकर  सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here