सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र कामगार सेनेची २५ शाखा स्थापना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र कामगार सेनेची २५ शाखा स्थापना

 

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र कामगार सेनेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कामगार सेनेचे शाखा स्थापना करण्याचे सिलसिला चालु आहे. त्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील जत तालुका परिसरात 25 शाखांची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दिली आहे.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे शाखा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात स्थापना करण्याचे कामकाज सुरू असुन त्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील 25 गावात स्थापना करण्यात आली. सांगली जिल्हा कामगार सेनेचे संपुर्ण कामकाजाचे आवाहन 1 ऑगस्ट 2021 रोजी श्री. दिनकर पंतगे यांनी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी (महाराज) व प्रदेश अध्यक्ष दशरथ नंदाल यांना सादर केले. या अहवालात संपुर्ण शाखाप्रमुखांचे नावे व सांगली जिल्हा कामगार सेनेची माहिती दिली. आणि लवकरच सांगली जिल्हा कामगार सेनेच्या माध्यमातुन कामगारांचा मेळावा घेणार असल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी सांगली जिल्हा कामगार सेनेचा अहवाल सादर करतांना विष्णु कारमुपरी (महाराज), दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीनिवास बोगा, गुरूनाथ कोळी, रेखा आडकी, गणेश म्हंता, संध्याराणी कुऱ्हाडकर, पप्पु शेख आदि उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here