*सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा वाढदिवस वंचितांसोबत साजरा*
*(कष्टकरी कुटुंबीयांच्या पालावर राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप!)*
दुष्काळी परिस्थितीत विविध अडचणींचा सामना करणाऱ्या कष्टकरी कुटुंबांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याच्या आवाहनातून प्रेरणा घेत हा उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपत वंचित घटकांसोबत साजरा करत सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी कोळे (ता. सांगोला) येथे पालावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले.
वाढदिवसाचा खरा आनंद केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्यात नसतो, तर आपल्या कृतीतून दुसऱ्याच्या आयुष्यातआनंदाचा एक क्षण निर्माण करण्यात असतो.एखाद्या गरजू कुटुंबाच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य, कष्टकरी बांधवांच्या मनात निर्माण झालेली आपुलकी आणि त्यांच्या ओठांवरून मिळालेले आशीर्वाद हीच आयुष्यातील सर्वात समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हाच खऱ्या लोकसेवेचा आनंद आहे, अशी भावना यावेळी चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संभाजी तात्या आलदर, मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर,ॲड. सचिन देशमुख, अमोल साखरे, संतोष करांडे, शिवाजी आलदर, हरीभाऊ सरगर, हरी आलदर (बोबडे), उद्धव करांडे, दादासाहेब कोळेकर, नवनाथ हातेकर, अनिल येडगे, आकाश सकट, विक्रम माने, निवास पांढरे, वैभव सोनवणे, विनोद कोळेकर ईश्वर सरगर, मारुती सरगर, शरद माने, श्रीनिवास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
