श्री विठाई अर्बन निधी बॅंक लवकरच पंढरपुकरांच्या सेवेत!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूरकरांच्या सेवेत लवकरच श्री विठाई निधी अर्बन बॅंक लि.पंढरपुर रूजू होणार आहे. या बॅंकेचे उद्घाटन दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर,ह.भ.प.देवव्रतराणा महाराज वासकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. मनसे नेते चेअरमन मा. दिलीप(बापू) धोत्रे व व्हा.चेअरमन जयवंतराव भोसले यांनी पंढरपूरकरांसाठी श्री विठाई निधी अर्बन बॅंक लि.पंढरपुर ची स्थापना केली असून उद्घाटन दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे.यामुळे कोरोना काळात अडचणी सापडलेल्या सर्व गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी व परिसरातील अर्थकारणाला नवी चालना मिळण्यासाठी तसेच नवी दिशा देण्याचे काम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती दिलीप (बापू) धोत्रे यांनी दिली.

तरी याप्रसंगी मा.कल्याणराव काळे, मा.भगिरथदादा भालके, मा.अभिजीआबा पाटील,मा.नागेशकाका भोसले,मा.अरूणभाऊ कोळी, मा.सुधीरभाऊ धोत्रे,मा. सुभाषदादा भोसले व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here