दामाजीची गुढी पाडव्याची साखर १०/- रुपये प्रति किलोप्रमाणे वाटप सुरू – चेअरमन मा. आ. समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दामाजी कारखान्याचे सभासदांना गुढी पाडवा सणासाठी देण्यात येणारी प्रती शेअर्स ३० किलो साखर प्रति किलो रु।१०/- या सवलतीचे दराने दि।२३/०३/२०२२ ते दि. १०/०४/२०२२ या कालावधीत सकाळी १०।०० ते सायं।५।०० या वेळेत वाटप करण्यात येणार असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन मा. आ. समाधानदादा आवताडे यांनी दिली। सदरहु साखर वाटप कारखाना साईट व मंगळवेढा नागणेवाडी कारखाना आॅफिस या दोन ठिकाणी असणार आहे। यामध्ये कारखाना साईट येथील साखर विक्री केंद्रावर उचेठाण, बठाण, मुढवी, ब्रम्हपूरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी या गावातील सभासदांची साखर मिळणार आहे तर मंगळवेढा येथे नागणेवाडी कारखाना आॅफिस मध्ये कारखाना साईट केंद्राव्यतीरिक्त शहर व तालुक्यातील इतर संपूर्ण गावातील सभासदांना सवलतीच्या दराने साखर विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे।  संबंधीत केंद्रावर कारखान्याने ठरवुन दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या  सभासदांची साखर कारखाना साईटवर सुट्टीचे दिवस सोडुन दुपारी २।०० ते ५।०० या वेळेत डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती प्र. कार्यकारी संचालक श्री रमेश गणेशकर यांनी दिली. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा।चेअरमन श्री अंबादास कुलकर्णी, संचालक श्री लक्ष्मण जगताप तसेच श्री भारत निकम,कारखान्याचे वर्क्स मॅनेजर श्री।गणपत घाडगे, चिफ केमिस्टश्री मोहन पवार,मुख्य शेती अधिकारी श्री रमेश पवार,कार्यालय अधिक्षक श्री दगडु फटे, सिव्हील इंजिनिअर श्री प्रविण मोरे, हेड टाईम किपर श्री आप्पासाहेब शिनगारे, स्टोअर किपर श्री उत्तम भुसे, सुरक्षा अधिकारी श्री।लक्ष्मण बेदरे, केनयार्ड सुपरवायझर श्री. प्रकाश पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here