श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 31,111 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न! 6 दिवसात कारखान्याने 31,111 क्विंटल पोती साखरेचे केले उत्पादन:आ. प्रशांतराव परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 31,111 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न!

6 दिवसात कारखान्याने 31,111 क्विंटल पोती साखरेचे केले उत्पादन:आ. प्रशांतराव परिचारक

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2021-22 मध्ये उत्पादित केलेल्या 31,111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन आ.मा.श्री प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या हंगामात कारखान्याकडे 14 लाख मे.टन ऊसाच्या नोंदी असून त्या सर्व ऊसाचे वेळेत गाळप करण्यात येईल कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होऊन 6 दिवसाचा कालावधी पुर्ण झालेला असून या हंगामात कारखान्याने 37,000 मे.टन गाळप करुन 31,111 क्विंटल पोती साखर उत्पादन केली आहेत. सध्या कारखान्याचा साखर उतारा 8.96 टक्के आहे. असे कारखान्याचे चेअरमन आ.मा.श्री.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की या हंगामात कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालणार असून प्रतिदिन 7200 मे.टना पर्यंत गाळप करणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत गाळप होणार आहे.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री वसंतराव देशमुख, संचालक श्री.दिनकरभाऊ मोरे, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री हरिषदादा गायकवाड, श्री.शिवाजीराव साळुंखे, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.सुरेश आगावणे, श्री.बाळासो यलमार, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.महीबुब शेख, श्री.नामदेव झांबरे, श्री.दिनकरराव कवडे, श्री.आनंदराव आरकिले, श्री.परमेश्वर गणगे, श्री.नागन्नाथ शिंदे, सौ.संगॣता पोरे, सौ.पार्वती नरसाळे, सौ.सिंधू पवार, श्री.भिमराव फाटे, श्री.अरुण घोलप आदि उपस्थित होते.
तसेच श्री. आर.बी.पाटील वर्क्स मॅनेजर, श्री एम.आर.कुलकर्णी प्रोडाक्शन मॅनेजर, श्री. एस. सी. कुमटेकर केन मॅनेजर, श्री. आर. एम. काकडे चीफ अकौंटंट, श्री. एच. एस. नागणे सिव्हील इंजि., श्री. एस. ई. शेख डिस्टीलरी मॅनेजर, श्री. एम. जे. देशपांडे मटेरिअल मॅनेजर, श्री. एस. एस. पोफळे वैद्यकिय निवासी अधिकारी, श्री. एस. एस. विभुते को-जन मॅनेजर, श्री. एस. पी. भालेकर ऊस विकास अधिकारी, श्री. ए. डी. बारटक्के डे.चिफ.इंजी., श्री. एम.एल.उपासे डे.चिफ.केमिस्ट श्री. टी. एस. भोसले कॉम्प्युटर इंचार्ज, श्री. आर. डी. गाजरे स्थावर अधिकारी, श्री. एस. एन. कदम हेड टाईम किपर, श्री. एस. वाय. सय्यद इन्युट्रमेंट मॅनेजर, श्री.बी.एस.बाबर सहा.कार्यालयीन अधिक्षक.

डॉ.यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here