मनोहर सपाटे यांस अटक न केल्यास स्वातंत्र्यदिनी निषेध आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मनोहर सपाटे यांस अटक न केल्यास स्वातंत्र्यदिनी निषेध आंदोलन

सोलापूर // प्रतिनिधी 

माजी महापौर मनोहर सपाटे यांनी कटकारस्थान करून लाभाच्या पदाचा गैरवापर करून, खोटे कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करून बेकायदेशीरपणे जागा हडप केल्याप्रकरणी मनोहर सपाटे आणि लता जाधव यांचे विरोधात मा. स्पेशल कोर्टाच्या आदेशानुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13(1)ड, 13 (2) आणि भां.द.वी. कलम 120 (ब), 196, 406, 408, 409, 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे सदर बझार पोलीस स्टेशन, सोलापूर यांचेकडील गुन्हा रजि. 456/2021, अन्वये दि. 20/07/2021 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु, गुन्हा दाखल होवूनही 14 दिवस उलटून गेले तरीही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तथा माजी महापौर मनोहर सपाटे आणि लता जाधव यांचेवर पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीच ठोस अशी कायदेशीर कारवाई केलेली नाही. किंवा दोन्ही आरोपींना एसीबी पोलिसांनी अटकही केलेली नाही. आरोपी मनोहर सपाटे आणि लता जाधव यांना दिनांक 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अटक न केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मा. जिल्हा सरकारी वकील यांच्या बेकायदेशीर, गैरवर्तनाच्या निषेधार्थ मुळ फिर्यादी तथा छावाचे योगेश पवार हे स्वातंत्र्यदिनी म्हणजेच दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी, लोकशाही मार्गाने निषेध आंदोलन करणार आहेत.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की.., सदर बझार पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. नं. 456/2021 या गुन्ह्यातील आरोपी माजी महापौर मनोहर सपाटे आणि लता जाधव यांचेवर कोणतीच ठोस कायदेशीर कारवाई किंवा अटक केली नाही. त्यामुळे दोन्ही आरोपीचे धाडस व मनोबल वाढले असून ते दोघेही बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत असून आरोपी सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्तपणे फिरत असल्यामुळे मुळ फिर्यादी योगेश पवारचे मानसिक खच्चीकरण होवून त्याच्या जीवित्तास एकप्रकारे अनिश्चित धोकाच निर्माण झाला आहे. मुख्य आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा व राजकीय नेता असल्याने त्यांचेकडून संबंधित एसीबी पोलिसांवर कारवाई व अटक न करणेबाबत दबाव येत आहे. मनोहर सपाटे याला पोलिसांनी मोकळे सोडल्यामुळे तो पुरावा नष्ट करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मनोहर सपाटे हे चार-चौघात थांबुन, माझेवर गुन्हा नोंद झाला तरी, एसीबी पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत, कारण मी संबंधितांना पैसे देवून मॅनेज केल्यामुळे अटक न करता अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मला मार्गदर्शन व मदत करीत असल्याची भाषा आरोपी मनोहर सपाटे करीत आहे. असे असतांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आरोपीस अटक केली नाही. त्यामुळे मनोहर सपाटे यांच्या बोलण्यास पुष्टीच मिळत आहे.
याआधी मा. कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाल्यानंतरही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मा. जिल्हा अभियोक्ता यांनी भूमिका संशयास्पद आणि मुख्य आरोपी मनोहर सपाटे यांस मदत करणारी आणि पुरावे नष्ट करण्यास वेळ देणारीच होती. त्यावेळी तर मा. कोर्टाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. हायकोर्टात अपील दाखल करण्याबाबतचा लेखी रिपोर्टच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी त्यांचेकडील जा.क्र. 376/2020 दिनांक 06/02/2020 अन्वये तसेच जा.क्र. 651/2020 दिनांक 13/03/2020 अन्वये मा. जिल्हा सरकारी वकील सोलापूर यांना सादर केलेला होता.
तर मा. जिल्हा अभियोक्ता यांनीही त्यावेळेस बेकायदेशीरपणे आरोपी मनोहर सपाटे यांस सहकार्य करण्याच्या दृष्टहेतूने मा. कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधातच मा. हायकोर्टात अपील दाखल करणेसाठी, पी. एस. जन्नु, सहाय्यक सरकारी वकील, सोलापूर यांचेकडील जा. क्र. 186/2020 दि. 03/04/2020 अन्वये विधी व न्याय विभाग, मुबंई यांचेकडे अपील प्रपोजल पाठविले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आणि मा. जिल्हा अभियोक्ता यांच्या अश्या बेकायदेशीर वागण्यामुळे, मा. कोर्टाच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल होण्यास तब्बल 18 महिन्याचा विलंब झाला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर व मा. जिल्हा अभियोक्ता यांच्या भूमिकेविषयी संशय येत आहे. आताही सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आरोपी विरोधात गंभीर कलमान्वये दखलपात्र गुन्हा दाखल होवूनही आरोपीस अटक न करता फक्त समन्स पाठवून तपास करण्याच्या प्रयत्नांत आहेत. वास्तविक पाहता या गुन्ह्यात समन्स पाठवून चौकशी करताच येत नाही.
केस मिटवून घेण्यासाठी आणि मनोहर सपाटे यांनी जामीन अर्ज ठेवल्यावर मुळ फिर्यादी म्हणून योगेश पवार यांनी काहीही हरकत घेवू नये, म्हणून मनोहर सपाटे यांचे मार्फत त्रयस्थ व्यक्तींकडून योगेश पवार यांचेवर बेकायदेशीरपणे दबाव टाकला जात असून केस मिटवण्यासाठी मनोहर सपाटे हे योगेश पवार यांस पैसे घेण्याची ऑफरही देत आहेत. तू पैसे घेतले नाही तरीही लाचलुचपत विभागातील पोलिसांना व जिल्हा सरकारी वकिलांना याआधी जसे मॅनेज केले होते. तसेच आताही मॅनेज करीन, असे जाहीरपणे मनोहर सपाटे हे बोलत आहेत. मनोहर सपाटे हे राजकीय दबाव टाकून योगेश पवार विरोधात त्रयस्थ व्यक्तींकडून खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे सदर बझार पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. नं. 456/2021 च्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोहर सपाटे आणि लता जाधव यांना तातडीने अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. योगेश पवार यांनी सांगितले. यावेळी डी.एन. भडंगे वकील उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here