शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने परतावा करणाऱ्या विमा कंपनी विरोधात तक्रार दाखल करा:उमेश (दादा)पाटील (जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आवाहन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने परतावा करणाऱ्या विमा कंपनी विरोधात तक्रार दाखल करा:उमेश (दादा)पाटील

(जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आवाहन)

सोलापूर जिल्ह्यातील मागील काही महिन्यांमध्ये अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा काढलेला असताना त्या विमा कंपनीकडून योग्य वेळी योग्य मोबदला मिळत नसल्याच्या काही तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नरखेड जिल्हा परिषद गटाचे सदस्य उमेश दादा पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आज त्यांच्याकडून एक सोशल मीडिया वरती व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मोबदला मिळाला नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी त्या विमा कंपनीच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल कराव्यात. विमा कंपनीकडून होणाऱ्या सातत्याने चुका सातत्याने एकाच शेतकऱ्याला वारंवार नुकसान भरपाई मिळणे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई न मिळता त्याच गावातील इतर दुसऱ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणे याचबरोबर ऑनलाईन फॉर्म दाखल करताना करण्यात आलेल्या चुका व, गावातील शेतकऱ्याला त्या पिकाच्या बाबत मिळालेली मदत म्हणजेच परतावा योग्य नसणे याबाबत तो शेतकरी समाधानी नसणे या सर्वांबाबत सर्व शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर यांच्याकडे आपल्याला आत्तापर्यंत मिळालेले सर्व पैसे त्याचे बँक स्टेटमेंट क्लेम केलेल्या पावतीच्या झेरॉक्स ज्या विमा कंपनीकडे तुम्ही विमा उतरवला आहे त्याची पावती, या सर्व गोष्टी घेऊन आपण तालुका कृषी अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक यांना जाऊन समक्ष भेटून त्या विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करावी असे या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेशदादा पाटील यांनी सर्वांना केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here