शिवसेना खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मेडिकल कॉलेजचे डीन यांना शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी कारवाई

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे डीन डॉ. श्याम वाकोडे यांना शौचालय साफ करण्यास खासदार हेमंत पाटील यांनी नुकतेच भाग पाडले होते. हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. वाकोडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई खासदार पाटलांवर करण्यात आली आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी विविध नेते, मंत्री रूग्णालयाला भेट देत आहेत. काल (मंगळवारी) काल खासदार हेमंत पाटील देखील रूग्णालयात आले होते. यावेळी डीन वाकोडे त्यांच्यासोबत होते. एका शौचालयाजवळ दोघेही पोहोचले, तेव्हा त्यात घाण होती. हे पाहून पाटील संतापले व त्यांनी वाकोडे यांच्या हातात झाडू देऊन ती साफ करण्यास भाग पाडले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here