रक्तदान सारखे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली : चेअरमन शिवानंद पाटील महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आजच्या काळात विज्ञानाने बरेच चमत्कार आपल्याला दाखवले आहेत पृथ्वी च्या उत्पत्ती पर्यन्त अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला ह्या विज्ञानाने करून दिला  पण आजवर आपण कृत्रिम रक्ताची निर्मिती करू शकलेलो नाही हे एक सत्य आहे आणि हे सत्य जगभरातील वैज्ञानिकाना नेहमीच आव्हान देत राहिले आहे  मानवी रक्ताला पर्याय शोधता आला नाही रक्तदान हेच  जीवनदान , रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे .मंडळाने रक्तदान सारखे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे प्रतिपादन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.

मंगळवेढा येथे महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे  उद्घाटन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  शिवानंद पाटील  यांच्या हस्ते  करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राहुल सांवजी, मुजमिल काझी, संदीप फडतरे, ,मंडळाचे अध्यक्ष अनिल शेवडे,प्रदीप खवतोडे,सिद्धार्थ लोकरे बापूसाहेब अवघडे, दयानंद आठवले  आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here