यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना पी.एफ.ची अंमल बजावणी करा :- कामगार सेनेची विभागीय आयुक्तांकडे मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना पी.एफ.ची अंमल बजावणी करा :- कामगार सेनेची विभागीय आयुक्तांकडे मागणी

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधीचे (प्रा.फंड) अमलबजावणी त्वरीत करा . अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कामरपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली नुतन विभागीय आयुक्त श्री . भुपेंद्र सिंह यांना देण्यात आले .
मा . भुपेंद्र सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . हे सर्व कामगार विणकर , रिलींग , कोम मशीन , गडी खाता , टॉवेल साफ , साप – सफाई , वॉचमेन , इव्हर , डब्लींग मशीन , मुनिम , हेल्पर , जॉबर , गाठी बांधणे , वार्पर , लेसींगवाला , मॅनेजर व इतर काम करणारे कामगार आहेत . त्यांना गेल्या 50 ते 60 वर्षापासून कामगार कायद्यानुसार कुठलाही लाभ मिळत नाही. त्यामुळे यंत्रमाग उद्योगातील कामगारांची आवस्था वेट बिगार पेक्षा दैयनिय झाली आहे . त्यामुळे यंत्रमाग उद्योगातील कामगारांना संरक्षण व आधार मिळावे म्हणून आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग उद्योगातील कामगारांना प्रा.फंड लागू करावे . यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने केली व करीत आहोत , तरीही कामगारांना काहीही पदरात पडले नाही .
सन 2018-19 साली यंत्रमाग उद्योगातील कामगारांना पी.एफ , कायदा लागू करावा . यासाठी सोलापूर पी.एफ. कार्यालयाचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. श्री. येमंत तिरपुडे साहेबांनी यंत्रमाग उद्योजकांना आपल्या कारखान्यातील कामगारांना पी. एफ. लागू करण्याचे आदेश काढले . परंतु यंत्रमाग उद्योजक विविध कारणे दाखवून पी.एफ. लागू करण्यास विरोध केले . तेव्हा महाराष्ट्र कामगार सेना , व सिटू कामगार संघटना संयुक्तपणे तर मनसे यंत्रमाग कामगार संघटना आणि अखिल भारतीय यंत्रमाग कामगार संघटना यांनी यंत्रमाग कामगारांना पी.एफ. मिळालेच पाहिजे . म्हणून आंदोलने केले . सदर प्रकरण न्यायालयात गेले . मे . न्यायालयाने यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना पी.एफ. लागू करा असा निर्णय दिला. परंतु त्याची अमलबजावणी अद्यापी यंत्रमाग धारक केले नाहीत . हा प्रकार न्यायालयाचा अपमान व कामगारांवर अन्याय करणार आहे .
तरी माननीयांना सोलापूरचे प्रा.फंड विभागीय अधिक्षक या नात्याने यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना प्रा.फंड लागू करून न्याय मिळवून द्यावे . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलेल्या शिष्ट मंडळात शोभा पोला , विजया बोगम , रेखा आडकी, संध्याराणी कु-हाडकर , पप्पु शेख, गणेश म्हता. गुरूनाथ कोळी, नागार्जुन कुसुरकर यांचा समावेश होतो .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here