महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि.5 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने व  शासकीय अधिकारी, कर्मचारी  यांच्या सहकार्याने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या  हुशार व गरजू विद्यार्थ्यांना  शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील  बहुउद्देशिय सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते अमोगसिध्द प्रशाला, कै.आशय्या ईरय्या अरकल मराठी विद्यालय, जय भारत प्राथमिक शाळा यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

 यावेळी तहसीलदार अमरदिप वाकडे, नगर प्रशासनचे सहायक आयुक्त एन.के.पाटील, महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंतनु गायकवाड, अशोक इंदापूरे , रघुनाथ बनसोडे, चद्रकात चलवादी , देवीदास शिंदे, प्रशांत भांडे,  शंकर जाधव, अनिल पवार , अनिल कोकाटे, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री. वाघमारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राबवित असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. हा उपक्रम पुढील काळात देखील असाच चालू राहावा. या उपक्रमासाठी आम्हीदेखील सहकार्य करू. तसेच विद्यार्थ्यांनीसुध्दा या उपक्रमाचा लाभ घेवून चांगले शिक्षण घ्यावे व जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here