मुळेगाव तांडा येथे 9 लाख 89 हजाराची गोवा राज्याची विदेशी दारु जप्त! सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कारवाई

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दिनांक 14 ऑगस्ट रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा हद्दीत सापळा रचून एका पत्रा शेडमध्ये अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला 133 पेट्या विदेशी मद्याचा एकूण रुपये 9 लाख 89 हजार किंमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क, सिमा तपासणी नाका सोलापूर निरीक्षक गुलाब जाधव यांनी 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवा राज्यातील विदेशी दारू अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवली असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सदर ठीकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासह जावून तपासणी केली असता एका संशयित बंद पत्रा शेडमध्ये गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीचे 50 बॉक्स, 750ML रीयल सेव्हन व्हिस्कीचे व रॅायल ब्लॅक व्हिस्कीचे 83 बॉक्स असे एकूण 133 बॉक्स व विविध ब्रँन्डचे एकुण अंदाजे 5000 लेबल्स आढळून आले. अवैधरित्या गोवा राज्यातील दारू विक्रीच्या उद्देशाने लपून ठेवलेल्या पत्राशेड च्या मालकाचा शोध सुरू असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री.कांतीलाल उमाप , संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त पुणे विभाग अनिल चासकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांचे मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आदित्य पवार , निरीक्षक सीमा तपासणी नाका गुलाब जाधव, निरीक्षक संभाजी फडतरे,दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, सचिन गुठे, मनीषा मिसाळ, सुनिल पाटील, अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, बिराजदार, होळकर, महिला जवान प्रियंका कुटे, जवान कर्मचारी मलंग तांबोळी, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, प्रकाश सावंत,अनिल पांढरे, आनंदराव दशवंत,वसंत राठोड,अमित गायकवाड,नंदकुमार वेळापूरे, इस्माईल गोडीकट,योगीराज तोग्गी, प्रशांत इंगोले, वाहन चालक मारुती जडगे,राम मदने,संजय नवले रशिद शेख यांनी केली आहे.

आवाहन
राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू / ताडी विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here